Thursday, April 30, 2020

हरिश्चंद्रगड नळीच्या वाटेनी चढाई आणि साधले घाटा मधून उतरन्याचा थरार!! १०जानेवारी२०१६!



निलेश चा फोन आला की कितीही अवघड ट्रेक असला तरी मी तयारच असतो. हरिश्चंद्रगड खिरेश्वर मार्गे केलेला होता. पण नळीच्या वाटेने कधी केला नव्हता. असाच निलेश चा फोन आला रामदास हरिश्चंद्रगड नळीच्या वाटेने करायचा आहे. नारायणगाव रात्री मुक्काम करायचा आहे. सुशांतच्या  भावाचे  घर आहे तिथे राहण्याची सोय आहे. सकाळी लवकर उठून वाल्हिवळे गावात जायचे आणि तिथुन ट्रेक चालू करायचा. तू तुझी स्विफ्ट घेऊन ये.  असे सगळे सांगितले.



पहाटे लवकरच आम्ही निघालो माझी आणि  सुशांत ची कार होती.  मी निलेश, सिद्धू, मिलिंद. चैतन्य. तुषार. मनिष. सुशांत, मुकुंद आणि त्याचा एक  मित्र असे आम्ही दहा लोक होतो. आम्ही 6.30 वाजता वाल्हिवळे गावा मध्ये पोचलो. तिथे आम्ही गाड्या पार्क केल्या. एका घरी पोहे आणि गरम गरम चहा असा नास्ता केला. एक ग्रुप फोटो काढला.




  त्या घरचाच एक लहान मुलगा आम्हाला नळीच्या वाटेचा रास्ता दाखवायला आला. आम्ही सकाळी 7.30 वाजता ट्रेक  ला सुरुवात केली. चार पाच तासात आम्ही कोकण कड्याला पोचू असा अंदाज होता. एक तासात आम्ही नळीच्या पायथ्याशी पोचलो. कोकण कड्याचे रूद्र रूप मनमोहुन टाकत होते. डाव्या बाजूला माकड नाळ आणि कोकण कडा दिसत होता. उजव्या बाजूला नळीची उंच वाट आम्हाला खुनवत होती. 





तिच्या कडे बघितले की मनात धडकीच भरत होती. माझ्या तर पोटात गोळाच आला.  पण सांगणार कुणाला. सगळ्यांच्या मागे मागे मी चालत होतो. सकाळी सकाळी उत्साह जोश होता. काही वाटत नव्हते. एक एक टप्पा आम्ही चढून जात होतो. तुषारने  याच्या अगोदर एकदा या वाटेने ट्रेक केला होता. त्याने रोप पण बरोबर आणला होता.  पुढे तो चालत होता.  काही ठीकाणी खूप उंच टप्पे होते.  पावसाळ्यात या मार्गाने  वरचे सगळे पाणी खाली येते त्याच्या खुणा ठिक ठिकाणी दिसत होते. पावसाळ्यात पण या वाटेने ट्रेककरणारे ट्रेकर्स आहेत. या वाटेने पावसाळ्यात ट्रेक करणे खूप अवघड आहे. वरून वाहत येणारे पाणी आणि आपण खालून वर जात असतो.





  बऱ्याच ठिकाणी खडक निखळले होते. त्याची दगड मोकळी झाली होती. मोकळी झालेली दगड खाली पडत होती. जो खाली आहे त्याच्या अंगावर पडण्याची शक्यता होती. वरचा माणूस खालच्याला आवाज द्याचा वरून दगड येतोय संभाळ. जीव मुठीत धरून एक एक पाऊल टाकावे लागत होते. घसरला की डायरेक्ट खालच्या टप्यावर आणि काय मोडेल ते सांगता येत नव्हते. मागे वळून पाहिले की  खूप खोल उतार दरी दिसत होता. आणि मनात विचार येत होता की आपण हे चढून आलो आहे? कोकण कडा आणि माकड नाळ स्पष्ट दिसत होती.  


एक उंच टप्पा आला साधारण वीस पंचवीस फूट असेल. हा टप्पा चढायचं म्हणजे दोर बांधूनच चढावा लागणार होता. हे काम तुषार ने केले. तो कपारी कपारी ला धरून वरती पोचला. वर एक झाड होते त्याच्या खोडाला त्याने दोरी बांधली. आणि आम्ही एक एक जन वरती गेलो. वरती गेल्यावर पण खाली खोल दरी होती . वीस फूट कपारी ला धरून धरून आम्ही सपाटीला पोचलो. आता आम्ही खूप वर आलो होतो. नाळ चढून आम्ही वर पोचलो होतो. खाली खूप खोल दरी दिसत होती आणि कोकण कडा खुनवत होता. खालचा नजरा खूप सुंदर होता. आम्ही त्या पॉईंट ला प्रत्येक चे फोटो काढले पाठीमागे कोकण कडा दिसत होता. वरचा रस्ता जंगला मधून जात होता.  अर्ध्या पाऊण तासात आम्ही कोकण कड्यावर पोचलो


दुपारचे एक वाजले होते. आज या वाटणे येणार आम्हीच होतो. कड्या वर गर्दी नव्हती. गडावरील एका हॉटेलच्या समोर झाडाखाली आम्ही बसलो. ट्रेकर्स ला बसायला चटई टाकली होती. मी पाहिलं बॅगेत ली पाण्याची बॉटल काढली पाणी पिलं आणि चटई वर पाठ टेकवली.  थोडा आराम केल्या नंतर बरोबर आणलेली चपाती भाजी काढली आणि हॉटेल वाल्याला पण थोडी ऑर्डर दिली त्याच्या दारात बसलो होतो. जेवण पटकन उरकले. आमच्या पैकी काही जणांना मंदिरा मध्ये जायचे होते. मंदिरात जाऊन यायला एक दीड तास लागणार होता. मी खिरेश्वर मार्गे आलो त्यावेळेस बघितले होते. ते जाऊन येई पर्यंत एक चांगली झोप होणार होती. मी आराम करायचे ठरवले. निलेश पण  थांबला आणि अजून एक दोन जण थांबले. आमचा आराम खूप चांगला झाला सगळा थकवा मरगळ निघुन गेली. परत जायला तयार झालो होतो.  मंदिरात गेलेले परत आले. हॉटेल वाल्याला चहाची ऑर्डर दिली. परतीच्या मार्गाची चौकशी केली. साधले घाटातून गेले की तीन चार तासात तुम्ही खालच्या बेलपाडा गावात पोचताल असे त्याने सांगितले. त्याचा मोबाईल नंबर घेतला काय अडचण आली तर फोन करा म्हणाला. आम्ही पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. चार वाजता आम्ही निघालो जाता जाता कोकण कड्या वरून खालचे दृष्य समोरची नळीची वाट अजून एकदा डोळे भरून पाहली. सादल्या घाटात पोचायला आम्हाला पाच वाजले असतील . सुरवातीलाच खाली उतरायला निमुळती वाट होती. दोन दगडांच्या मधून उतरायला आवघड जात होते. बॅगा खाली देऊन आम्ही एक एक जन उतरत होतो. तो भाग उतरायला आमचा बराच वेळ गेला अंधार पडला


प्रत्येकने आपल्याआपल्या बॅगे मधून बॅटरी काढली. पाणी प्यायला आणि चालायला सुरुवात केली. ही वाट पण उतरायला अवघड होती. एक ओढाच होता. डोंगरावरचे पाणी याच ओढ्याने खाली जात होते. आम्ही जंगला मधूनच चाललो होतोरातकिड्यांचा किर्र किर्र आवज येत होता. वाळलेल्या पाचोळ्याचा आवाज येत होता. आम्ही कुठे चालोय बरोबर चालोय का नाही काही समजत नव्हते. मी दमलो होतो. गुढघ्यावर लोड येत होता. मी सगळयात मागे पडलो.  वाट तर काय समजतच नव्हती. अंधारात कीती चालतोय किती अंतर राहिले आहे काहीच समजत नव्हते. आता सगळेच दमले होते. थोडी आरमाची गरज होती. मला तर खूप
एका ठिकाणी सपाट जागा बघुन आम्ही तिथे थोडा आराम करायचे ठरवले. सगळे त्या जागे वर थोडा वेळ पडले . त्या सपाट मोठ्या दगडा वर झोपल्या मुळे आकाशतले तारे सुंदर दिसत होते. आज अमावास्या होती म्हणून सर्वत्र अंधाराचे साम्राज्य होते. जंगलातली ती अमावास्या ची रात्र कोणीच कधी विसरणार नाही.  समोर एक गाव दिसत होते. पण अजुन किती लांब आहे माहीत नव्हते. आम्ही आमच्या गाड्या ज्या  गावात लावल्या आहेत ते हेच आहे का माहीत नव्हते. सगळ्या जवळचे पाणी संपले होते. बॅटरी डिस्चार्ज झाल्या होत्या. वाट माहीत नव्हती. आता ज्या लाईट दिसतायत त्या जंगलात गेले की गायब होणार होत्या. थोडावेळ आराम करून आम्ही निघालो. खालच्या गावात पोचायला किती वेळ लागणार आहे समजत नव्हते. आम्ही चालायला सुरुवात केली त्या वेळीरात्रीचे दहा वाजले होते. त्या ओढ्या मधूनच आम्ही चालत होतो. ओढ्या मध्ये मोठं मोठे दगड होते. थोडं पुढे गेले की माझा गुढघा धुकायला लागला. माझा चालण्याचा वेग कमी झाला. मी सगळ्यात मागे राहीलो. आता माझ्या आणि बाकीच्या मधले अंतर वाढायला लागले. ते मला त्यांच्या बॅटरीचा उजेड दिसायचं बंद झाले
माझी बॅटरी बंद केली तर मला माझाच हात दिसत नसे. इतका अंधार होता. रात किड्यांचा आवाज जोर जोरात येत होता. वाळलेल्या पाचोळ्या वर पाय पडला की त्याचा अजून वेगळाच आवाज. भीतीतर वाटत होती. हॉरर पिचर मधले सिन आठवत होते. घाबरून उपयोग नव्हता. कसेही करून चालत राहीचे होते. पुढून निलेश आवाज द्यायचा रामदास. मी मागून आवाज द्यायचो आलो आलो. पण मी त्यांच्या पर्यंत पोचलो की त्यांची निघायची तयारी झालेली असे. मला त्यांच्या पर्यंत पोचायला पंधरा वीस मिनटं लागायची इतका मोठा गॅप आमच्या मध्ये असायचा. माझा गुढघा इतका दुखत होता की मी लहान लहान दगड पण बसून उतरत होतो.  मी  दमलो पण  होतो. माझी बॅटरी पण संपली होती. निलेश नि त्याची बॅटरी मला दिली. आता आम्ही सपाटी ला लागलो होतो. समोर लाईट दिसत होत्या. थोडे  जवळ गेले की समजले ते क्रिकेट चे मैदान होते. तिथे पाण्याचा ड्रम भरलेला होता. त्याच्यातून सगळ्यांनी आपल्या आपल्या बाटल्या भरून घेतल्या पोटभर पाणी पिले. थोडा आराम पण मिळाल. थोड्याच अंतरावर बेलपाडा गाव होते. पण आम्ही गाड्या लावलेलं गाव आजून पुढे होते. तिथे पोचायला अर्धा तास लागला. मला पोचायला पाऊण तास लागला. माझे पाय अजून दुखात होते. आम्हला आमच्या गाड्या जवळ पोचायला साडेबारा वाजले होते. जे आम्ही आठ वाजता पोचणार होतो. दुपारची शिल्लक राहिलेली चपाती भाजी खाली आणि निघालो
माझ्या गाडीत मी निलेश सिद्धू चैतन्य आणि मनीष बसले. बाकीचे सुशांतच्या गाडीत. माळशेज घाटत पोचायला आम्हला जास्त वेळ लागला नाही. तोच निलेश मला म्हणाला रामदास मला झोप लागली आता तु गाडी चालावं. हे तर अवघडच झाले मी सांगितलं घाटा मध्ये मी कधी गाडी चालवली नाही तू मला घाट पास करून दे मग मी चालवतो. पण त्याला झोप कंट्रोल होईना तो म्हणाला तुला जशी चालवता येईल तशी चालव. हे नवीनच संकट माझ्या समोर आले. मागचे तिघांना पण गाडी चालवत येत नव्हती. दुसरी गाडी पुढे गेली होती. काही करून मलाच गाडी चलवायची होती. मी स्टेरिंग वर बसलो आणि गाडी चालवयला सुरुवात केली. मी हळूहळू गाडी चालवत होतो. घाट सुरू झाला होता. आम्ही येताना अंधारच होता त्यामुळे घाट कसा आहे हे माहित नव्हते. पण वाचले होते की हा घाट खूप अवघड आहे. मुंबईला जाण्याऱ्या लाईन च्या गाड्या याच मार्गाने जातात. जाताना मी आरामात बसलो होतो. पण आता मी अनुभवत होतो.  हळूहळू करून मी घाट पास केला. थोड पुढे गेलो की एक टपरी बघून आम्ही चहा प्याला थांबलो. थोड फ्रेश झालो. आणि निघालो मी नारायणगाव पर्यंत गाडी चालवली
नारायणगाव मध्ये मुकुंद आणि त्याचा मित्र उतरले. आम्ही त्यांना निरोप दिला सुशांतला आणि बाकीच्यांना पण आम्ही इथेच निरोप दिला. आता निलेश गाडी चालवयला बसला. मी सुटकेचा सुस्कारा सोडला आणि बाजूला आरामात बसलो. पण खेड चा घाट उतरला की त्याला परत झोप आली. मी पून्हा गाडी चालवायला बसलो त्यांना निगडीला सोडून मला घरी पोचायला पहाटेच्या पाच वाजले होते. मी घरी पोचेपर्यंत निलेश ला झोप नाही लागली. मी घरी पोचल्याच एसेमेस केला. 
माझ्या कडे दोन अनुभवू पहिला हरिश्चंद्रगड नळीच्या वाटेनी चढाई आणि साधले घाट मधून उतरन्याचा थरार ते पण एकाच दिवशी. दुसरा माळशेज घाटामधून रात्रीची गाडी चालवणी. हे दोन्ही अनुभव मी ना विसारणारे आहेत. सादलेघट घाटाने तर माझी परीक्षा घेतली.
!!!धन्यवाद  !!!

25 comments:

  1. 1st Hard trek in my life
    Thanks to Nilesh sir, Tushar Khade,
    Ramdas bhau,
    One day madhe nalichi wat jaun parat utarlo hoto parat return driving.
    Pan maza ali

    ReplyDelete
  2. Beautifully written... worth it..

    ReplyDelete
  3. Bhari tharar anubhavla well done Ramdas, Nilesh, Siddhu & Team💐💐💐 Keep your habit continue. Congratulations all team💐💐👌👌

    ReplyDelete
  4. खूप छान लिहिलंस ��
    तू एक विसरलात की ती अमावस्याची रात्र होती ��

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks !! Lakshat nahi rahila

      Delete
    2. एक वेळ अमावास्याची रात्र परवडेल पण नळीची वाट नाही 😁😂😂

      Delete
  5. वा सुंदर वर्णन केले तुम्ही वाचताना असे वाटले मी पन सोबत होतो ट्रेक वर

    ReplyDelete