Sunday, May 3, 2020

Southern Hemisphere Ride - Blitzkrieg Riding Club, Pune. - Part I



दक्षिण भारत बुलेट राईड खूप दिवस पासून प्लॅन चालली होती.
अगोदर ताडोबा आणि बांधवगढ ची राईड झाली होती.त्यामुळे राईडींग चा आत्मविश्वास वाढला होता. मी मधुर आणि धीरज आमच्या तिघांची मैत्री एकदम घट्ट झाली आहे. हि राईड अगोदरच्या राईड पेक्षा थोडी लांब होती. ताडोबा टोटल १७०० किमी. बांधवगढ २८०० किमी आणि आत्ताची डायरेक्ट ३५०० किमी. होती. 
आमचा प्लॅन गणपती च्या अगोदर होता.  म्हणजे गणपती बसवायला घरी पोहचु असा प्लॅन केला होता. पण कोल्हापूर  सांगली मध्ये मुसळधार पाऊस पडला होता. पंचगंगेला महापूर आला होता त्यामुळे पुणे बंगलोर रोड पाण्याखाली होता. आम्हाला आमची राईड पुढे ढकलावी लागली. पाऊस थांबताच नव्हता. कर्नाटक मध्ये पण पाऊस जोरातच होता. पुढे आंद्रप्रदेश तामिळनाडू मध्ये पण पाऊस होताच. पाऊस काय थांबायला तयार नव्हता. थोडा उघडायचा लगेच दुसऱ्या दिवशी चालू. हवामान खात्याचा अंदाज घेत होतो, पुढे कुठे पाऊस आहे का नाही.
गणपती च्या अगोदर जायचे होते. गणपती आले  आणि गेले पण. दसरा जवळ येत होता. आमचा प्लॅन ते दिवसाचा होता. घटस्थापना २९ ऑक्टोबर ला होती.  म्हणजे २८ ला तरी रिटर्न आले पाहिजे. आणि आता जर राईड कॅन्सल केली तर पुन्हा लवकर होणार नव्हती. शेवटी काही झाले तरी जायचे असे ठरले. त्यानुसार २१ तारीख फायनल केली. त्याच्या नुसार आमची तयारी चालू झाली.

 मधुर आणि धीरज ने त्यांची बाईक क्लासिक ३५० वरून हिमालीयन ला अपग्रेड केली होत. त्या मुळे हि राईड थोडी वेगळी होणार होती आणि आम्ही तिघेच होतो. मी पण माझी बाईक सर्व्हिसिन्ग करून घेतली.। सॅडलबॅग, मोबाइल चार्जेर बाईकला बसून घेतला। तिघांच्या बाईक राईडला तयार झाल्या होत्या.
पुणे- बँगलोर- मदुराई- रामेश्वरम- धनुष्कोडी- पॉंडिचेरी- तिरुपती बालाजी- तुमकूर- कोल्हापूर-पुणे  असा मार्ग ठरला।


(राईड चा ओरिगिल प्लॅन )

जाण्याच्या एक दिवस अगोदर आम्ही भेटलो आणि सगळं लिस्ट नुसार घेतले कि नाही। किती वाजता निघायचे खर्चाचा अंदाज काढला. रूट, पाऊस, या सगळ्याचा अंदाज घेऊन चर्चा केले.
आणि २१ तारखेला सकाळी .१५  वाजता प्लॅटिनम ऑटो फातिमानगर ला भेटायचे आणि .३० राईड सुरू  करायची असे ठरले. आणि त्यादिवसाची चर्चा संपवून आम्ही एकमेकांना शुभरात्री करून घरी गेलो.

दिवस पहिला.


(राईड ची सुरुवात प्लॅटिनम ऑटो फातिमानगर )

सकाळी .०० चा  गजर लावला होता. गजर वाजायच्या आधीच जाग आली. मधुर आणि धीरज ला फोन केला.
बरोबर .३० ला आम्ही प्लॅटिनम ऑटो ला जमलो. ब्रिफिन्ग काय कराचे नव्हते ठरल्या प्रमाणे धिराज लीड आणि मधुर स्वीप मी मध्ये. वातावरण थंड होते. आकाशात ढग दिसत नव्हते. आज बंगलोर ला मुक्काम करायचा असा विचार करून आम्ही .४० ला निघालो. जुन्या कात्रज घाटामधून निघालो. थोडा अंधारच होता. शिरवळ जवळ सकाळी सकाळी काही रनर रनिंग करताना दिसले. त्यांच्या मध्ये माझे एक मित्र पण होते सुशील शर्मा, आमचे स्पीड १०० च्या पुढेच होते म्हणून मला  काय थांबता आले नाही. शिरवळच्या थोडे पुढे आम्ही पहिला ब्रेक घेतला. नास्ता करून लगेच निघालो. खंबाटकी घाट चढून गेल्या नंतर पाऊसाची चिन्ह दिसूलागली काळे काळे ढग, धुके असे वातावरण  होते. डोंगर हिरवेगार होते. निसर्ग खूप सुंदर दिसत होते. निसर्गाचा आनंद घेत आम्ही चालो होतो.

  आमचा स्पीड १००-११० होता. कोल्हापूरच्या अलीकडे दुसरा ब्रेक घेतला. साई इंटरनॅशनल नावाचं हे रेस्टॉरंट होतं. त्या फूडमॉल मध्ये अजून बाकीचे पण बायकर्स होते. कोणे दांडेलीला चालेले होते कोणी गोव्याला. त्याच्यातले काही मधुरच्या ओळखीचे होते. अर्ध्या पाऊणतासाच्या ब्रेक नंतर आम्ही पुन्हा सुरवात केली.  कोल्हापूर जवळ आल्यानंतर समजले कि मागच्या  महिन्यात पाऊसाने किती नुकसान केले होते. पंचगंगेच्या आजूबाजूची शेतजमीन सगळी पाण्या खाली गेली होती. पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.  बेळगावच्या जवळ साधारण दुपारी .३० वाजता आम्ही जेवणा साठी  एका धाब्यावर  थांबलो. हा ब्रेक थोडा मोठा होता. .०० वाजता आम्ही रायडींग ला सुरवात केली. .३० वाजता एक लहान ब्रेक घेतला. एक सुंदर पाण्याचे तळ रोड चा कडेला दिसले. आम्ही काही फोटो काढले, त्याच्या बरोबर एक छोटासा ब्रेक पण झाला.


(इंडियन मेहबूब ढाबा- दुपारचे जेवण)


(पाण्याचे तळ )





काही किलोमीटर गेल्या नंतर कॉफी ब्रेक घेतला .३०- .०० वाजले असतील २० -२५ मिनटात लगेच निघालो टार्गेट बंगलोर होते. आभाळ भरून आले होते. एका बाजूला काळे ढग जमा झाले होते आणि एक बाजूला सूर्य अस्ताला चालला होता. समोर पाऊस पण पडत होता इंद्रधनुष्य खूप सुंदर दिसत होते. गाड्या बाजूला घेऊन आम्ही रेनसुट घातले कारण कधीहि पाऊस सुरु होऊ शकतो. पुढे गेल्या नंतर पाऊस चालूच झाला. पाऊसाचा ज़ोर चांगलाच वाढला. टोल नाक्या वर आम्ही थांबलो कारण पाऊस खूप जोरात चालू झाला होता. अर्ध्या तासात पाणी पाणी करून टाकले. पाऊस उघडे पर्यंत आम्ही कॉफी घेतली. अर्ध्या तासात पाऊस उघडला .३० वाजले होते. तुमकूर १५-२० किलोमीटर राहिले होते.  आम्ही निघालो - किलोमीटर गेल्या नंतर सगळा रास्ता कोरडा होता. आम्ही ठरवले कि बंगलोरला जाऊन मुक्काम करायचा बंगलोर अजून ८० किलोमीटर राहिले होते.

अंधार पडला होता. तुमकूरच्या जवळ आलो  होतोएक पुलावर धिरज ची बाईक एका मोठ्या खड्यात आपटली आणि एक जर्क बसला, त्याने लगेच रिअर व्हिव मिरर मध्ये पहिले आणि स्पीड कमी केली. मी साईड ला होतो मी खडा चुकवला पण मधुर त्याच खड्यात धाडकान आपटला आणि कशी तरी बाईक कंट्रोल केली आणि दुर्घटना टाळली. पूल उतरल्या नंतर आम्ही गाड्या साईडला घेतल्या आणि पहिले कि दोघांचे बाईकची  रिम बेंड झाली आहे आणि हॅन्डल हि खाली सरकले होते. आम्ही ठरवले कि मुक्काम तुमकूर मधेच करायचा .३० वाजेल होते. गूगल वर रूम शोधायला सुरवात केली. गावामध्ये एक हॉटेल सापडले हायवे पासून थोडे आत होते. हॉटेल कन्फर्म करून ऑनलाईन पेमेंट केले आणि. हॉटेल वर गेलो. आजचे रनींग ७५० किलोमीटर झाले होते.   बॅग सोडल्या आणि रूम मध्ये गेलो. .३० वाजले होते. फ्रेश झालो आणि जेवण कुठे मिळेल याची चौकशी केले.
धीरज आणि माझे मात असे होते कि आपण पूर्ण दिवस राईड केली आहे तर आता रूम वरच जेवण मागवूया. आम्ही पटकन Swiggy वर चेक केले आणि डिलिव्हरी सुद्धा मिळत होती. पण मधुर ला ते काही पटलं नाही. त्याने हट्ट केला आपण जेवायला बाहेर जाऊया. आम्ही पटकन तयार होऊन जेवायला बाहेर पडलो. थोडे शोधले आणि एका रेस्टॉरंट मध्ये नॉनव्हेज जेवण केले. आम्ही जसे रेस्टॉरंट मधून निघालो तशी एक मुसळधार पावसाची सर आली आणि रूम वर पोचे पर्यंत आम्हाला चिंब भिजवून गेली.  त्या वरून आम्ही दोघे मधुरची चेष्ट करू लागलो कि "चला बाहेर जाऊन मस्त जेवण करूया, Swiggy वर कशाला ऑर्डर करायची ". पण हो ह्या पावसात भिजण्याची पण मजाच वेगळी होती. आम्ही रूम वर पोचलो आणि कपडे सुखायला टाकले, जी रूम आधी नवीन कोरी दिसत होती, ती आता एक धोबी घाट दिसूलागली. सकाळी .०० वाजता निघायचे ठरले. उद्याचा प्रवास मदुराई होता. ५५० किलोमीटर जायचे होते. आजचा प्रवास खूप झाला होता. आम्ही दमलो होतो. लगेच झोप लागली.


दिवस दुसरा .
   सकाळी .00 वाजता उठलोएक एक करून तिघांचे उरकले. .३० वाजता चेक आऊट  केले. बॅगा लोड केल्या. आणि बाजूलाच एका हॉटेल मध्ये नास्ता केला आणि निघालो. बंगलोर शहर पास केल्या नंतर होसूर हायवे लागला त्या हायवे वर टुव्हीलर ला टोल होता आम्हाला आश्चर्यच वाटले कारण महाराष्ट्रात आणि मागच्या दोन लॉन्ग राईड मध्ये आतापर्यंत आम्ही टुव्हीलर ला  कुठे टोल नव्हता दिला. रोड चांगला होता  जसा मुंबई पुणे एक्सप्रेस. ह्या संपूर्ण रोड वर आम्हाला खूप सारे फुलपाखरे दिसले. त्या फुलपाखरुनि पूर्ण रास्ता भरला होता. खूप होती आणि ती गाड्यांच्या मध्ये येत होती आणि मरत होती. आज पाऊस कुठेच नाही लागला११.३० - १२ पर्यंत आम्ही होसूर पास केले आणि एक ब्रेक घेतला. साऊथ इंडियन नास्ता आणि कॉफी घेतली. नास्ता उरकून आम्ही निघालो. उन्हाचे चटके चांगलेच लागत होते. थोडे पुढे गेल्या नंतर एक झाड बघून आम्ही ब्रेक घेतला आणि थोड्या वेळ विश्रांती घेतली.

(हौसुर टू व्हिलर टोल)






आमच्या गाडयांना पण थोडा आराम मिळालाआम्ही थोड्या वेळात निघालोपुढे कावेरी नदीच्या पुलावर थांबून थोडे फोटो काढले आणि छोटासा ब्रेक घेतला.४५ - .०० वाजले होते.  मधुराई अजून ६० की.मी  होते आणि पुन्हा मुसळधार पाऊस सुरु झाला. आम्ही ठरवले की डायरेक्ट मधुराई ला थांबायचं आणि नॉनस्टॉप पाऊसात गाडी चालवली. हायवेय चांगला होता म्हणून आम्ही गाड्या पळवू शकलो, पण त्या मूळे पावसाचे फटके लागत होतेच. हायवेय सोडून आम्ही जसा मधुराई रोड ला टर्न घेतला पाऊस जणू गायब झाला.
मदुराईला आम्ही .३० वाजता पोहोचलो असेलदुसऱ्या दिवशी दर्शन घ्यायला  जायचे होते म्हणून मीनाक्षी मंदिराच्या जवळच रूम बुक केलीरूमवर पोहचून गाड्या पार्क केल्या बॅग घेऊन रूम मध्ये गेलोआज पाऊसात भिजलो होतो आणि थोडे थकलो होतोफ्रेश होऊन जेवण करायला गेलो. सौथइंडिअन जेवण करून येऊन लगेच झोपलो.








दिवस तिसरा
सकाळी लवकर उठून अंघोळ करून दर्शना साठी गेलो. मंदिर जवळच होते आम्ही चालतच गेलो.
मंदिराला जाताना आम्हाला एक वयस्कर माणूस भेटला त्याने आम्हाला उत्तर नाही तर दक्षिण गेट ने प्रवेश सुरु आहे आसा सांगितलं. त्याने असा का सांगितलं ते नंतर समजला. 
मीनाक्षी मंदिर ११९० ते १२१६ या काळातील राजा कुलसेकर  पंड्या ने बांधले आहेमीनाक्षी सुंदरेश्वर मंदिर हे मधुराई शहराच्या मध्ये भागी आहे. या मंदिर ला 14 प्रवेश द्वार आहेत. संस्कृत मध्ये त्याला गोपुरम म्हणतात.  त्याच्या पैकी बाहेरील बाजूला चारही दिशेला चार गोपुरम आहेत. त्यांची उंची नऊ मजली आहे  पैकी दक्षिणेचा प्रवेशद्वार ची उंची सर्वात जास्त आहे  ती170 फूट आहे. प्रत्येक कमानिवर वेगवेगळ्या देवी देवतांची सुबक आणि सुंदर रंगवलेल्या आहेत. यापैकी सुंदरेश्वर च्या मंदिरात साठी पाचआहेत आणि मीनाक्षी मंदिरासाठी तीन गोपुरम आहेत. कंपाऊंडच्या भिंती पण उंच आहेत. आम्ही मंदिरा मध्ये उत्तरे च्या प्रवेशद्वार मधून प्रवेश केला. 

या परिसरा मध्ये वेगवेगळी मंदिर आणि मंडप आहेत. या मध्ये दोन मुख्या मंदिर आहेत. मीनाक्षी मंदिर आणि सुंदरेश्वर मंदिर. मीनाक्षी या शब्दाचा अर्थ मीन (मासा) आणि अक्ष (डोळा) या शब्दां पासून तयार झाला आहे. मिनाक्षी ही पार्वतीचे रूप आणि सुंदरेश्वर हे शंकराचे रूप आहे. भगवान विष्णु ने त्याची बहीण पर्वती चे लग्न भगवान शंकरा बरोबर लावून  दिले होते. मीनाक्षी आणि शंकराच्या लग्नाला सर्व देवी देवता आले होते. हे लग्नकार्य त्याकाळातील सर्वात मोठे कार्य झाले होते.  देवी मीनाक्षी आणि भगवान शंकर चे मुख्य मंदिर आहेत. दोन्ही मंदिराचे कळस सोन्याचे आहेत. दक्षिणे मध्ये भगवान शंकराच्या मंदिरा मध्ये शंकराला महत्व आहे. फक्त या मंदिरात मीनाक्षी देवी  मुख्य आहे आणि तिला जास्त महत्त्व आहे. दोन्ही मंदिराची पूजा दिवसातून सहावेळा होते. त्या मध्ये अभिषेक वश्रअलंकार आरती आणि नैवद्य अश्या पद्धतीने होते. 
आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो ती वेळ पूजेचीच वेळ होती. देवीला सुंदर पांढरी साडी नेसवली होती आणि चौकोनी आकाराच्या कमानी मध्ये दिवे लावले होते. मीनाक्षी दैवी चे दर्शन त्या दिव्यांचा उजेडात दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले. मंदिर मध्ये गेल्यावर खूप प्रसन्न वाटले. मंदिराच्या प्रत्येक खांबावर सुंदर व आकर्षक कोरीव नक्षीकाम केलेलं आहे. छताला पण खूप सुंदर डिझाईन आणि रंगकाम केलेले आहे. मुख्य मंदिराच्या बाजूने मोठे मोठे पॅसेज आहेत. प्यासेज स्पॅन २०– २५ फूट असेल त्याला टाकले दगडी बीम अखंड आहे. मी आणि मधुर चर्चा करत होतो की इतका मोठा स्पॅन आहे तरी कसाकाय तो दगडी बीम टाकला असेल नाहीतर आत्ताचे आर सि सि डिझाइनर सांगतात स्पॅन जास्त आहे बीम ची डेपथ वाढवावी लागेल कॉलम साईझ वाढवावी लागेल किंवा स्पॅन कमी करावा लागेल किती प्रश्न आणि कारण असतात. 
त्या काळात कसेकाय केले असतील अशी कामे. आम्हाला आश्चर्य वाटत होते. एकठिकाणि छता मध्ये होल आहे आणि फ्लोअरिंग वर एक पॉईंट मार्क केलेल्या आहे त्या पॉईंट वर जाऊन पाहिले तर मंदिराचा कळस दिसतो. आणि त्या कळसा मध्ये सूर्याचे प्रतिबिंब दिसते. सुंदरेश्वर मंदिराच्या बाहेर गणपतीची खूप सुंदर आणि मोठी मूर्ती होती. ती एका अखंड दगडा मधेच बनवलेली आहे. मंदिराच्या पश्चिमदिशेस एक मोठे तळे आहे. त्याला सोनेरी कमळ तलाव म्हणतात. त्या तलाव मध्ये भाविकांची अभ्यंगस्नानाची सोय केलेली आहे आणि त्याच्या बाजूलाच छोटे मोठे मंडप आहेत त्या मध्ये भाविकांची राहण्याची सोय केलेली आहे. काही मंडपात लग्न पण होतात.  मंदिराचे ट्रस्ट चे ऑफिस, स्टोरे रूम, हत्तीचे शेड असे वेगवेगळे छोटे मोठे हॉल आहेत. 
 मुख्य हॉल हा १०० खांबांचा आहे. या हॉल मध्ये नटराज ची मूर्ती आहे. ती मूर्ती डाव्या पायावर उभे आहे आणि उजवा पाय दुमडलेला आहे. आणि इतर ज्या तांब्याच्या मुर्त्या असतात त्या उजव्या पायावर उभा आणि डावा पाय दुमडलेला आहे. म्हणून या हॉल मधली मूर्ती विशेष आहे. या हॉल मधल्या खांबावर देवाच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. सहा खांबांचा एक छोटा मंडप आहे. त्या मंडपात झोपाळा आहे आणि प्रत्येक शुक्रवारी मीनाक्षी देवी आणि सुंदरेश्वर देवाला आणले जाते. आणि त्या झोपाळ्यावर बसवले जाते. बाहेर दोन द्वारपाल आहेत.
 १००० खांबांचा एक मोठा हॉल आहे पण प्रत्यक्षात  मात्र ९८५ खांब आहेत १५ खांबांच्या जागी दोन मंदिरांनी व्यपली आहे.
याच्यात दोन खांबाच्या लाईनवर  शरीर सिहांचे आणि तोंड हत्तीचे असे आहे. हॉलचे सिल्लिंगचे डिझाईन  पण सुंदर आणि कलरफुल आहे. या हॉल मध्ये वस्तू संग्रहालय आहे. काही वस्तु हत्तीच्या दाता पासून बनवलेल्या होत्या. हॉल मधून बाहेर आल्या वर बाहेरजाण्याच्या दरवाज्या जवळ एक हत्तीण होती.  ती वीस वर्षाची असेल. ज्या वेळेस देवीची रथयात्रा असते त्या वेळेस मिरवणूकी मध्ये तीला सुंदर सजवतात. मी तिच्या सोंडे मध्ये पैसे दिले तर तिने लगेच ते तीच्या माहूत कडे दिले. आणि अजून एकदा कळसाचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. मंदिरा मध्ये मोबाईल फोन कॅमेरा घेऊन जाऊ शकत नाही म्हणून आम्ही ते प्रवेशद्वारा जवळील लॉकर मध्ये ठेवले होते. ते घेऊन आम्ही बाहेरून फोटो काढले आणि रूम वर गेलो.




आज रामेश्वरम ला जायचे होते. आजचे अंतर २५० किलोमीटर होते. दुपार पर्यंत आम्ही पोहचू या हिशोबाने आम्ही निघालो. शहराच्या बाहेर गेल्या नंतर  रस्ते मोकळेच होते. रस्त्यावर फार गर्दी नव्हती. आम्ही सुसाट निघालो. एका  ठिकाणे ढग असे दाटून आले होते कि. आकाशातून कोणी तरी पृथ्वीवर पाणी ओतल्या सारखे वाटत होते. त्या ठिकाणी थोडे थांबून आम्ही फोटो काढले. निसर्गाचा आनंद घेत आमची राईड चालू होती. थोडे पुढे गेल्या नंतर आमच्या उजव्या बाजूला समुद्र किनारा होता . आम्ही समुद्रकिनाऱ्याच्या बाजून चाललो होतो.. पाम्बन पुलावर थांबून फोटो काढ्ले दोन्ही बाजूला समुद्र आहे.  रामेश्वरम मध्ये आम्ही .३० वाजता पोहचलो








(पाम्बन ब्रिज)

मंदिरात दर्शन घ्यायला जाण्याच्या अगोदर समुद्रात जाऊन अंघोळकरून पुन्हा २२ कुंडात अंघोळ करून. मंदिरात दर्शन घ्यायला जावे लागते. आम्ही आमच्या बॅग्स ठेवण्या साठी एक हॉटेल बघितले आणि बॅगा ठेऊन आम्ही समुद्रात अंघोळ करायला गेलो. अंघोळ करून प्रत्येक कुंडात जाऊन अंघोळ केली. प्रत्येक कुंडाजवळ एक माणसू थांबलेला असतो तो कुंडातले पाणी कडून प्रत्येकाच्या डोक्यावर ओतत होता ,  अश्या प्रकार आम्ही २२ कुंडात अंघोळ केली. कपडे बदलून आम्ही दर्शन साठी गेलो. रामेश्वरम हे चार धाम पैकी एक धाम आहे. दर्शन घेऊन बाहेर येईपर्यंत आम्हाला वाजले होते. आम्ही लगेच धनुष्यकोडी कडे निघालो. धनुष्यकोडी म्हणजे श्री रामाने या गावामधून रामसेतू बांधून लंकेला गेले होते. आम्हाला गेट वर पोहोचायला .4 वाजले होते. वाजता गेट बंद होते हे आम्हाला माहित नव्हते. आम्ही ऑफिसर ला विनंती करून प्रवेश मिळवलं त्यांना सांगितले कि आम्ही .३० पर्यंत लगेच बाहेर येऊ या अटीवर त्यांनी आम्हाला प्रवेश दिला. आम्ही सुसाट सुटलो १२० चे स्पीड असेल रास्ता मोकळाच होता दोनी बाजूला समुद्र आणि आम्ही सुसाट समुद्रात चालोय वाह काय अनुभव होता. १० किलोमीटर गेल्या नंतर अजून एक चेक पोस्ट आले. ऑफिसर ने आम्हाला थांबवले सांगितले याच्या पुढे तुम्हाला जाता येणार नाही. खूप विनवण्या केली पण काय उपयोग झाला नाही. ऑफिसर ने सांगितले कि नंतर प्रवेश बंद  होतो. श्रीलंका आणि हिंदुस्तानची बॉर्डर असल्या मुळे नेव्हलच्या अंडर हा परिसर असल्या मुळे प्रवेश बंद आहे. जर तुम्ही पकडला गेलात तर तुमाला जेल आणि दंड पण होऊ शकतो. 


(रामेश्वरम मंदिर)





(धनुष्कोडी बीच)



त्यांना विनंती करून आम्ही बाजूच्या बीच वर जाण्याची परवानगी काढली आणि बीच वर गेलो. सूर्य अस्तला चाल होता. काय सुंदर नजारा होता.  तो आम्ही कॅमेऱ्यात आणि डोळ्या साठवून घेतला आणि रिटर्न  निघालो. आमचा मुडऑफ झाला. आम्हाला इतक्या जवळ येऊन शेवटच्या टोकावर जाता आले नाही. सकाळी लवकर यायचे असा विचार करून आम्ही निघालो.  रामेश्वरम मध्ये येऊन रूम बुक केले. रूम वर आलो. फ्रेश झालो. हॉटेल मध्ये डिनर ऑर्डर केले. आणि. रूम मधेच उद्याचे शेड्युलची चर्चा केली. तो पर्यंत जेवण तयार झाले  होते. सकाळी लवकर निघायचे ठरले होते. जेवण करून आम्ही झोपलो.



No comments:

Post a Comment