Quick Link to Part I
Part III
Part II cont..
तो अलार्म लगेचच वाजला झोपायलाच १२ वाजले होते. समजलाच नाही कधी पाच वाजले. सगळ्यानी एक एक करून सकाळचे विधीउरकले. कॉफी सांगितली होती ती पायली. तो पर्यंत जिप्सी गेट वर येऊन थांबली होती. धीरज आणि अमेय ने कॅमेरे आणले होते. ते बरोबर घेतले. थंडी इतकी होती कि आम्ही टी शर्ट त्याच्यावर स्वेड शर्ट आणि त्याच्या वर रायडींग जॅकेट अशे घातले होती तरी खूप थंडी वाजत होती. जिप्सी मध्ये गेल्या नंतर त्याच्या मध्ये प्रत्यकासाठी ब्लॅंकेट ठेवले होत. नास्ता आणि कॉफी चे एक बॅग पण ठेवली होती. ड्राइवर आमचीच वाट बघत होता. आम्ही गेल्या नंतर लगेच त्याने स्टार्टर मारून आम्हाला घेऊन गेला. गाडी चालू झाल्या नंतर तर खूप थंडी आणि गार हवा लागत होती. आम्ही ताला गेट वर पोहचून ड्रायव्हरने गेट पास घेतला आणि आम्ही मेन गेट वर गेलो. तिकडने गाईड घेऊन आम्ही जंगला मध्ये प्रवेश करणार होतो. जिप्सी ची खूप मोठी लाईन होती. साधारण २०-२५ जिप्सी असतील.

१९४७
मध्ये रीवा राज्य मध्य प्रदेशमध्ये विलीन झाले; बांधवगढ मध्य प्रदेशाच्या नियमावलीत
आले. रीवा महाराजांनी अजूनही शिकार अधिकारांचे पालन केले. १९६८ पर्यंत या क्षेत्रांचे राष्ट्रीय उद्यान म्हणून
ठरवण्यात आले नव्हते तेथे विशेष संरक्षण उपाय
योजले योजलेले नव्हते . तेव्हापासून बांधवगढ राष्ट्रीय उद्यान एक निर्मीत नैसर्गिक
निवासी म्हणून अनेक पावले उचलली गेली आहेत.
१९७२ मध्ये प्रकल्प टाइगर गठित करण्यात
आला आणि त्यानंतर १९७२ चा वन्यजीव संरक्षण
कायदा लागू झाला. बांधवगढ निवासस्थानच्या १०५
वर्ग किमी चे संरक्षण पुरेसे होते म्हणून १९८२ साली खिटौली, मगधी आणि कल्लावा यांना कमी करण्यात
आले. या क्षेत्रास विस्तार करण्यासाठी ताला श्रेणी (मूळ बांधवगढ राष्ट्रीय उद्यान)
कमी करण्यात आले. बंधवगड ते ४४८ वर्ग किमी प्रकल्पाच्या वाघाने आपल्या क्रियाकलाप आणि प्रभावाचा
क्षेत्र कमी केला म्हणून १९९३ मध्ये बंधवगढला
त्याच्या आराखड्यात नेले गेले आणि १९३ किमी किमीचे मुख्य क्षेत्र स्थापन करण्यात आले. पूर्वी
नामित रेंज आणि पानपाठा अभयारण्य ४३७ किमी च्या बफर क्षेत्रासह बांधवगढ टाइगर रिझर्व घोषित
करण्यात आले होते.
बरोबर ७.०० वाजता गेट मधून जिप्सी जंगलात सोडायला सुरवात झाली. सकाळी ७ ते ११ पर्यंत सफारीचा वेळ होती. गेट मधुन प्रवेश केल्या नंतर लगेच उजव्या बाजूला पाळलेला हत्ती आणि त्याचे पिलू होते. आणि दुसऱ्या बाजूला आसाम मधून आलेले जंगली हत्ती लाकडाच्या पिंजऱ्यात ठेवले होते. हे जंगल खास वाघा साठी प्रसिद्द आहे. या जंगलात बिबट्यांचे प्रमाण
पण खूप आहे. या जंगला मध्ये हरणांच्या वेग वेगळ्या जाती पाहायला मिळतात. अशी माहिती गाईड आम्हाला सांगत होता . आम्ही थोडे पुढे गेल्या नंतर आम्हाला हरणाचा मोठा कळप चरताना दिसला.
100% जंगल पैकी फक्त २०% जंगल पर्यटकाना साठी खुले आहे बाकी ८०% मध्ये प्रवेश नाही. जिप्सी ड्राइवर त्याच्या नेमून दिलेल्या रोडने गाडी घेऊन जात होता. गाईड आम्हाला सांगत होता कि प्रत्यकाने आजुबाजुला लक्ष ठेवा कधी कुठलं तरी प्राणी दिसू शकतो. त्या प्रमाणे आम्ही लक्ष ठेऊन होतो. आज आम्ही स्पॉट "T " या वाघिणीच्या परिसर मध्ये फिरणार होतो. त्या वाघिणीच्या तोंडावर इंग्रजी अक्षर T आकाराचं ठिपका आहे म्हणून तिचे नाव स्पॉट T ठेवले होते.
अशी आमची साफीर चालूच होती. थंडी खूप वाजत होती ब्लॅंकेट होते तरी सुद्धा. सकाळी सकाळी काही पक्षी सुद्धा दिसत होते पक्षांचा अभ्यास करणार धीरज होताच आमच्या बरोबर तो सांगत होता हा कुठलं तो कुठलं. चांडियार, कबूतर,
घुबड, गिधाड,
गरुड,
पावशा, पोपट,
टिटवी, खाटीक, मोर / लांडोर, नीलकंठ अशे पक्षी या जंगलात होते आम्ही आपला हो हो म्हणत होतो. पुढे गेल्या नंतर सांबर दिसले. पण स्पोटी T काही दिसेना. गाईड आम्हाला एक पाण्याच्या तळ्या जवळ घेऊन गेला होता. त्या तळ्यातले पाणी इतके शांत होते कि बाजूच्या डोंगराचे प्रतिबिंब हुबे हुब त्या पाण्यात पडले होते त्याच फोटो खूप सुंदर आला आहे.
खूप फिरलो पण ती काय दिशेनेच शेवटी बाहेर पडण्याची वेळ झाली. ११.०० वाजे पर्यंत बाहेर गेट वर पोहचायचे होते म्हणून ड्राइवर ने गेट च्या दिशेनं गाडी घेतली थोड्याच वेळात आम्ही गेट वर पोहचलो. या सफारीत आम्हाला काय वाघ दिसला नाही. आमच्या अजून तीन सफारी बाकी होत्या. त्याच्यामुळे काय वाईट वाटले नाही. गेट वर गाईड ला सोडून ड्राइवर आम्हाला रिसॉर्टवर घेऊन गेला. दुपारची सफारी ३.०० वाजता होती. आम्ही रिसॉर्टवर पोहचलो. ११.३० वाजले होते तरी थंडी वाजतच होती. रूमवर जाण्याच्या अगोदरच दुपारच्या जेवणाची ऑर्डर दिली. दुपारी व्हेज आणि रात्री नॉनव्हेज असे जेवण होते. दुपारी १.३० टाईमिंग सांगितलं कारण दुपारच्या सफारी साठी २.३० जिप्सी घ्याल येणार होती. रूमवर आम्ही गेलो फ्रेश झालो. थोडावेळ अराम केला. १.१५ वाजता आम्ही डायनिंग हॉल मध्ये जेवायला गेलो. गरम गरम जेवण जेवलो. आणि लगेच रूम वर आलो. कपडे बदले. तोपर्यंत गेट वर जिप्सी आली होती.
या वेळेस वेगळा ड्राइवर होता. तीन वाजता गेटवर पोहचलो. यावेळेस गाईड पण वेगळा होता रूट वेगळा होता. या वेळेस भागोडीच्या परिसरात हा गाईड घेऊन जाणार होता. भागोडी वाघिणीचे नाव आहे. तिला तीन छावे आहेत. ते चार पाच महिन्यांचे असतील. जाताना आम्हाला हरणांचा कळप दिसले. जंगल घनदाट होते. वानर झाडाची पान तोडत होती आणि त्या झाडा खाली हरणं चरत होती. बाजूला काही टेकड्या दिसत होत्या त्या टेकड्यां मध्ये गिधाडांची घर होती त्या डोंगराच्या कपारी मध्ये ते राहतात. त्या कपारी मधुन पांढरे ओघळ आलेले दिसत होते. गाईडने सांगितले कि ते पांढरे जे दिसत आहे ते त्यांची विस्टा आहे. आकाशात उडताना पण दिसत होती काही गिधाड. बाजुलाच बांदवगड दिसत होता. प्रभू श्री रामाने लक्षिमणाला वनवासात असताना या परिसरावर लक्ष ठेवायला सांगितले होते तेव्हा लक्षिमनाने या गडावरून लक्ष ठेवले होते. त्या मुळे याला बांधवगड असे नाव पडले आहे.
एका रोड वर आम्हाला वाघाच्या पायाचे ठसे दिसले. आजूबाजूला बघितले आपण जवळपास कुठे काही दिसले नाही. आमच्या अगोदरच्या जिप्सीला रोड क्रॉस करताना दिसला होता. आम्हाला आतापण पायाच्या ढाश्यावर समाधान मानावे लागेल. थोडा निराश झालो होतो कारण दोन सफारी मध्ये आम्हाला वाघ दिसला नव्हता. तरी आम्ही अशा सोडली नव्हती. अजून दोन सफारी बाकी होत्या. आम्ही गाईडला सोडून रिसॉर्टवर गेलो. आराम केला कॉफी मागवली. फ्रेशझालो तोपर्यंत कॉफी आली. कॉफी पिली अराम केला. रात्रीचे जीन आम्ही उशिराच करणार होतो साधारण १०.०० वाजता. जुनी गाणी ऐकत होतो. गप्पा चालू होत्या. रिसॉर्टच्या मालकांनी. चार्जर वाघावर लिहिलेले पुस्तक दिले होते ते धीरज वाचत होता. चार्जर चा सगळा इतिहास दिला होता.

९.३० वाजता आम्ही जेवायला गेलो.
आज बाहेरच शेकोटी बनवायला सांगितली होते. तशी त्यांनी सोय पण केलेली होती. मधोमध एक खडा केला होता आणि बाजूला खुर्च्या ठेवल्या होत्या. बाहेर खुप थंडी होती. आम्ही पोहचे पर्यंत शेकोटी चांगली पेटली होती. मी खुर्ची बाजूला सारून खाली जमिनीवरच बसलो. मला माझी लहानपानाची आठवण आली हिवाळ्या मध्ये आम्ही अशीच शेकोटी करून त्याच्या बाजूला बसायचो. जेवण उरकले आणि झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर सफारीला जायचे होते. सकाळी ५.अलार्म लावला. आजची आमची तिसरे सफारी होती. सकाळी ६.०० जिप्सी येऊन थांबलीच होती. आजचा ड्राइवर थोडा वयस्कर आणि हटाकटा होता. पण त्याने
जिप्सी काय जोरात चालवली मजाच आली.
तो म्हणाल आज मी तुम्हाला वाघ दाखवणारच. आम्ही गाईडला घेऊन गेट मधुन एन्ट्री केली. आज दोन हत्ती पण सफारीला निघाले होते. काल सकाळी जो रूट होता तोच आजचा होता. आज आम्हाला स्पोटीचे दर्शन होणार होते. स्पोटीचे परिसराच्या दिशेने सगळ्याच जिप्शी चालल्या होत्या. आम्ही तळ्यवार चकर मारून पुढे गेलो. थोडे अंतर गेल्या नंतर एक जिप्सी क्रॉस झाली. त्यांनी सांगितले कि स्पोटी आताच रोड क्रॉस करून गेली आहे. आम्ही जर ताळ्यावर गेलो नसतो तर कदाचित आम्हाला आज दिसली असती. आम्ही त्या दिशेनं जाऊन आलो ती रोडवर बसल्याचा खुणा दिसल्या. आणि ती ज्या दिशेला गेली आहे तिकडे गेलो. आम्ही गेलो तर अजून दोन तीन जिप्सी अगोदरच येऊन थांबल्या होत्या,. त्याच्यात एक फॉरेनर होता. आम्ही बराच वेळ थांबलो पण कसलीच हालचाल झाली नाही. आम्ही कंटाळून कॅन्टीन ला गेलो.
आम्ही लेट गेलो होता कॅन्टेन वर चारच जिप्सी होत्या. बाकीच्या येऊन गेल्या होत्या. आम्ही आमच्या जवळचा नास्ता काढला आणि खायला सुरवात केली. नास्ता संपला कॉफी पिली. आणि कॅन्टेनन मध्ये ड्राइवर साठी चहा ऑर्डर केला होता. त्याने चहा प्याला सुरवात केली आणि अचानक हातातला चहाच कप फेकून दिला आणि जिप्सीच्या दिशेनं पळतच सुटला आम्हाला समजेनाच तो असा काय करतो. तो आम्हाला तिकडणेच आवाज देत होता पटकन गाडीत बसून घ्या. तो इतका जोरात पळत होता कि त्याच्या शर्टच्या खिशात ला मोबाइल फोन उडुन खाली पडला. घाई घाई तो त्यानं उचल त्याच्या कडे बघितला पण नाही तो चालू आहे बंद पडलाय. गाडी ला स्टाटर मारून इतकया स्पीड त्याने गाडी वळवली आणि जोरात पळवली कि असे वाटत होते रेसचे गाडीत बसलो आहे. एक माघे एक अशा सगळी जिप्सी त्या दिशेनं चालल्या होत्या. धूळ खूप उडत होती. अमेय ड्राइवर ला म्हणत होता भया थोडा धीरेसे चलाव. पण तो त्याच्या स्पीड नेच चालू होता. इतकयात समोरुन दुसरी जिप्सी अली सगळं मोसम कट झाला. तो क्रॉस झाल्या नंतर त्याने परत स्पीड पकडला.
पण आम्हाला पोहचायला थोडा उशीर झाला. आणि स्पोटी रोड क्रॉस करून झाडीत गेली. आम्हाला तिची थोडीशी हालचाल दिसली. पण पूर्ण दिसली नाही. थोड्या वेळा पूर्वीचा फॉरेनर तिथेच होता. त्याने तिचे फोट काढले होते. ती जवळच होती पण आम्हाला दिसत नव्हती. सकाळचे हात्ती त्याच परिसरात होते. ते रोडवर आले आणि जिप्सी मधल्या काही लोकांना घेऊन परत जंगलात गेले. आणि त्यांना दाखवून आणले. आम्ही दुसऱ्या रोड वर जाऊन थांबलो ती तो रोड क्रॉस करून जाणार होती. तिकडे सगळ्या जिप्सी येऊन थांबल्या होत्या. सगळे तिची बाहेर येण्याची वाट बघत होते. आणि ती दिसले एक झाडाच्या मागून बाहेर येत होती. कॅमेराच्या शूटरचे आवाज कट कट सुरु झाले जो तो कॅमेरा मध्ये फोटो काढत होता. मी मोबाइल मध्ये तिचे विडिओ शूटिंग केले.

गाईड आणि ड्राइवर आपल्या गाडीतील लोकांना ती कशी दिसेल याची धड पड करत होते. जो तो आपली गाडी पुढे घेत होता. आणि स्पोटी आरामात चालली होती. म्हणजे तिला काय घेणे देणे नाहीच कि आपल्याला बघण्या साठी लोक इतकी धडपड करतायत. ती सरळ थोडे अंतर रोडने चालली आणि रोड क्रॉस करून जंगलात गेली.
आमच्या आनंद गगनात मावेनासा झाला. आमची राईड सफल झाली होती. आमच्या इतकया लांबच्या राईड चे चीज झाले होते. सगळे खूप समाधानी होते. कि स्पोटी दिसली. सगळी जिप्सी गेट च्या दिसणे निघाल्या. गाईड ला सोडून आम्ही रिसॉर्ट वर गेलो. दुपारी अजून एक सफारी होती. दुपारचे जेवण करून आम्ही आमच्या शेवटच्या सफारी ला गेलो. आता वाघ दिसो आगर ना दिसो काही फरक पडणार नव्हता. जर वाघ दिसला तर तो बोनस ठरणार होता. माणसाचं समाधान होता नाही अपेक्षा असतातच. तसे आम्ही पण निघालो. आताच रूट भागोडीचा वाघ होता त्या एरिया गेलो. माकडाचा कॅल्लिंग चा वॉज येत होता. कॉलइंग म्हणजे जर वाघ दिसला तर हरण माकड एक प्रकारचा आवाज करतात आणि बाकीच्या प्राण्यांना सावध करतात. आम्ही बराच वेळ थांबलो पण ती काय बाहेर अली नाही. आम्ही पुढे गेलो पाण्या जवळ एक सांबर पाणी पिताना दिसले. थोडा अंधार पडला होता बाहेर जाईची वेळ झाली होती. पुढे गेलो काही जिप्सी थांबल्या होत्या. तिथे भागोडीचे तीन बछडे होते, अंधार पडला होता. ते काय स्पस्ट दिसले नाही. पण त्यांची हालचाल दिसली.
ते बघून आम्ही गेट वर गेलो. गाईड ला सोडुन आम्ही. रिसॉर्टवर गेलो . बांधवगडने आम्हाला निराश केली नाही. आमचे समाधान झाले होते. रात्रीचे जेवण करून आम्ही झोपलो. दुसरया दिवसाचं प्रवास सुरु करायचा होताच. सकाळी लवकर उठून ८ वाजत आम्ही रिसॉर्ट सोडले.

"आणि आम्ही खजुराओ ला प्रयाण केलं"
"खजुराओ पुढील भागात"
"क्रमशः"Part III

Khupach chan!!!
ReplyDeleteBadhiya👍
ReplyDeleteMastach
ReplyDeleteBHARICH !!!
ReplyDeleteGreat!!!!!😃
ReplyDelete