🚩पन्हाळा ते पावनखिंड मोहीम🚩
१९/७/२०१५आणि २०/७/२०१५
पन्हाळा पावनखिंड हे शाळेत असताना इतिहासामध्ये वाचला होते. पन्हाळ्यावरून शिवाजी महाराजांची सुटका. तेवढंच माहित होते. शाळेत असताना पन्हाळगडावर सहल गेली होती त्यावेळेस सातवी/आठवीत असेल. शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे अशीच थोडीफार नावं माहित होती. कधी अशी मोहीम करेल असे वाटले देखील नव्हते.पण एक दिवस निलेश चा फोन आला म्हणाला रामदास पन्हाळा पावनखिंड मोहीम करायची का.
६२-६५ किलोमीटर आहे... दोन दिवस आहे...जंगल दरीमधून पावसात चिखलात चालायचे आहे. ज्या वाटेने महाराज विशाळगडावर गेले होते तो हा मार्ग आहे. कोल्हापूरचा निसर्गवेध परिवाराचे भगवान चिले सर यांनी आयोजन केले आहे. ४००-४५० लोक असतात. आमच्याच ट्रेकच्या ग्रुप मधील प्रशांत ने ही माहिती दिली होती. तो या निसर्गवेध परिवार ग्रुप साठी पुण्यामधून काम करतो. त्यांच्या काढून सगळी माहिती शांत पणे ऐकून घेतली. ६२-६५किमि म्हणजे खूप मोठे अंतर होते. एकदिवसात ३५ किमी चालायचे होते. मी या मोहिमे अगोदर छोटे छोटे ट्रेक केले होते हा ट्रेक म्हणजे खूपच मोठा होता. पण थोडा विचार करून मी होकार दिला ते बरोबर असले म्हणजे मी कसला हि ट्रेक करू शकतो फक्त मनाची तयारी पाहिजे. मी विचारले कोण कोण असणार त्यांनी सांगितले तू मी सिद्धू आणि सुशांत. असे आम्ही चोघे कन्फर्म आहेत असे त्यांनी सांगितले. मी प्रशांत ला पुण्यात भेटून पुन्हा एकदा सविस्तर माहिती करून घेतली आणि चौघांचे पैसे जमा केले.
१९/२०-७-२०१५ या दोन दिवसांची ही मोहीम होती .आम्हाला एक दिवस अगोदरच कोल्हापूरला जावे लागणार होते. सकाळी ७.३० वाजता कोल्हापूर एसटी स्टँडवर सगळ्यांना जमायचे होते. त्यानुसार आम्ही प्लॅन केला .१८ तारखेला दुपारीच आम्ही पुण्यामधून निघालो मी निलेश सिद्धू आणि सुशांत. रात्री आम्ही कोल्हापूर ला पोहचलो. स्टॅन्ड जवळच हॉटेल बघितले कारण सकाळी चालतच स्टॅण्डवर पोहचू. या साठी प्रशांतची मदत घेतली. त्याने एक चांगले हॉटेल बघून दिले आम्ही जेवण करून लगेच झोपलो.
७.३० वाजता आम्ही एसटी मधे बसलो आणि पन्हाळ्या कडे निघालो. ९.०० वाजता आम्ही शिवा काशीद समाधी जवळ पोहचलो. तिथे समाधीला वंदन केले आणि भगवान सरानी ट्रेक बदल सगळी माहिती आणि नियम सांगितले.
९.३० वाजता आम्ही ट्रेक चालू केला शेतातून बांधावरून आम्ही चालत होतो. सुरवातीलाच एक उंच डोंगर लागला. तो चढून वरती गेलो की पन्हाळा गडावर पोहचतो समोरच नरवीर बाजीप्रभू देशपांडेंचा मोठा पुतळा दिसला. आम्ही वंदन करून पुढे गेलो. फुटक्या नदीच्या उगमस्थाना जवळ पोहचलो तिथून पदभ्रमंतीला सुरवात होती. सगळे तिथे पोहचल्या नंतर पुनश्च एकदा सरानी माहिती दिली आणि ट्रेकला सुरवात झाली. जंगलातून आम्ही चालायला सुरवात केली एक डोंगर उतरून अजून एक चालून गेले कि म्हसाई चे पठार सुरुवात झाली
६-७ किलोमीटर या पठारावर एक हि झाड नाही. नजर जाईल तिथंपर्यंत फक्त हिरवी शाल पांगरून टाकल्या सारखे वाटत होते. दुपारी १२:३० वाजता म्हसाई माता मंदिरा जवळ पोहचलो असेल. दगडी बांधकाम असलेलं एक छोटंसंच मंदिर होते. यात्रेसाठी येणारी भाविकां साठी पाण्याची सोय केली होती. एक हातपुम्प बसवला होता. मंदिर सामोरे एक झाडे होते अख्या माळरानावर ते एकच झाड होते. तिथे एक ब्रेक घेतला आणि बरोबर आणलेलं खाऊन घेतले. पाऊस नव्हता ऊन पडलेलं होते. सगळीकडे हिरवे हिरवे दिसत होते कुठे झाड नाही. पाउसा पडुन गेला होता. जमीन ओलीच होती.थोडा वेळ अराम करून आम्ही पुन्हा सुरवात केली. माळावर काही मेंढपाळ मेंढ्या बकरी चारायला अले होते. एका बकऱ्या बरोबर मी मस्ती पण केली त्याचा एका भारी फोटो निलेश ने काढला.
अशी मस्ती करत आम्ही तो पठार चालत होतो. आज पहिलाच दिवस होता. अजून उत्साह चांगला होता. पठार संपल्या नंतर खाली उतरायचे होते. उंच वाढलेले गवत आणि जंगली झाडे. दगड धोंड्यातून पायवाटेनं आम्ही चालत होतो. अश्या वाटेनं महारांजाची पालखी घेऊन ते मावळे कसे चालले असतील याचा विचार करूनच अंगावर काटे यायचे. आणि निवांत नव्हते चालायचे व मागे सिद्धीचे सैनिक पाठलाग करतच होते. ते दिवस पण पावसाळ्याचेच होते. आभाळ आले होते. पावसाची एक सर आली आणि ओलं करून गेली. मी आता दमायला लागलो होतो माझा स्टॅमिना संपत आला होता. निलेश सिद्धू आणि सुशांत मस्त चालले होते.तो डोंगर उतरून गेल्या नंतर डाव्या बाजूला डोंगरावर दगडांचे खांब उभा कलेत असे दिसत होते. असे बरेच दगड जवळ जवळ उभे केलेले दिसत होते.
आम्ही ज्या गावा मध्ये पोहचणार होतो ते जवळ अले होते. आता आम्ही रोड वरून चालत होतो. तो रोड कसला सगळी खडीच खालून पायाला ती खडी टोचत होती माझी शक्ती संपली होती. बळंच चालत होतो पायाला खडी टोचत होती आधी चिखल आणि आता बूट पण सगळे ओले झाले होते... चीकचीक झाली होती. पुढे जाऊन थांबून हे तिघेजण माझी मजा बघत माझी वाट बघत होते. मी बळंच चालत होतो. आम्ही आमच्या मुकामाच्या गावात पोहचलो कर्पेवाडी म्हणून ते गाव होते. प्रत्येक घरात १०-१२ जण असे राहण्याची सोया केली होती. गावातली घरे दगडी बांधकाम असलेली आणि कौलारू होती. फरशी नव्हतीच त्या जागी सारवलेली जमीन होती. ती पण गुळ गुळीत अमूल्य फार्शीला काय करता. कुठे हि जॉईंट नसलेली. स्वच्छ नीट निटका तो हॉलच होता भिंती मध्ये देवळ्या केलेल्या होत्या त्या देवळी मध्ये एक कोंबडी बसलेली होती. आणि त्याच घरात डाळभात अशी जेवणाची सोय होती पाऊस पडून गेलं होता. आम्ही बाहेर ठेवलेल्या पाण्यानी हातपाय धुवून घेतले... कपडे बदलले... बरोबर आणलेले अंथरून पांघरून अंथरले आणि थोडा वेळ पडलो. थोड्या वेळाने जेवण आले जेवण केले. मी मालिश तेल आणले होते त्याने थोडी पायाची मालिश केली आणि झोपलो. सकाळी ५.३० लाच उठायचे होते. रात्री पायाला थोडा आराम मिळाला होता. आम्हाला सकाळी लवकर उठायचे होते.त्यामुळे आम्ही लवकर झोपलो.
ठरल्याप्रमाणे सकाळी लवकर उठलो.. बाहेर गेलो तर पाठीमागच्या साईडला उंच डोंगर गर्दहिरवीगार झाडी. आणि डोंगराला अडलेली ढग. असा निसर्ग बघायचा असेल तर अशा प्रकारच्याच गावात गेले पाहिजेत. गावातील घरांची संख्या जास्त नसेल ६०-७० घर असतील. गावात एसटीची सोय नाही. शाळापण प्राथमिक पर्यंतच. कसे राहत असतील हि लोक? ना मॉल ना, सिनेमा हॉल , बाहेरल जागा पासून लांब. ना गाड्यांचा आवाज ना प्रदूषण. स्वच्छ हवा आणि सुंदर निर्सग. .ब्रश केला हातपाय धुऊन आम्ही बॅगा भरल्या फक्त नाश्त्यासाठी लागणारे ताट आणि ग्लास बाहेर ठेवला. नाश्त्याला पोहे होते. भरपेट नाश्ता केला. चहा प्यायलो. प्लेट ग्लास धुवून बॅग मध्ये ठेवला. आणि ज्याचे उरकलेलं असेल त्या ग्रुप ला निघायला सांगितले. रात्रीच्या आरामा मूळे आणि मालिश मूळे आज नवीन उत्साह आला होता. नवीन जोश ने आजच दिवस चालू केला. गावामधून बाहेर पडायला आम्हाला जास्त वेळ लागला नाही. छोटाच गाव होते ते. गावातली लहानलहान मुले आमच्या कडे बघत होते. आम्ही बरोबर आणलेले चॉकलेट त्यांना दिले याची कल्पना प्रशांत ने अगोदरच दिली होती.आतां आम्ही भाताच्या शेतातून... बांधावरून चालत होतो.पाय चिखला मध्ये रुतत होते एक काढला कि दुसरा अडकायचा अशी आमची मजा चालली होती. चिखलात चालण्याचं आनंद घेत चाललो होतो. मला माझी शाळेतली आठवण झाली कारण आम्ही अशेच चिखला मधून चालत शाळेत जात होतो.
शेती संपल्या नंतर आम्ही जंगल मधून चालायला लागलो. पुढे चालून गेल्या नंतर एका ओढा लागला. त्या ओढ्या मध्ये बसून आम्ही काही फोटो काढले. वरून पाऊस पडत होता. ओलेचिंब झालो होतो. किड्यांचा किर किर असा आवाज मधेच बेडकांचा आवाज.
दाट झाडी, जंगलातून पाय वाटणे आम्ही एका माघे एक असे निसर्गाचा आणि पाऊसाचा आनंद घेत चाललो होतो. दुपारी पांढरीवाडी गावात जेवण होते. जेवणाची सोय निसर्गवेध परविवराने केली होती. काही सभासदानी पुढे जाऊन जेवण बनवलेलं होते. आमटीभात आणि गुलाबजामून असे चविष्ट जेवण होते. दुपारचे जेवण केले. अजून 12 किलोमीटर अंतर राहिले होते. जेवण करून आम्ही चालायला लागलो. आता डांबरी रॊडनेच चालायचे होते. ५-६ किलोमीटर गेल्या नंतर मी दमलो माझे पाय चालायला तयारच होईना. तरी बळच चालत होतो. अजून ६ किलोमीटर जायचे होते निलेश समोरून आवाज देत होता चला रामदास थोडेच राहिले आहे. आणि मी चालत होतो.
आम्हाला घेऊन जाणार एसटी माघुन आली. त्याच्या मध्ये परिवार तील काही लोक चालले होते मला विचारले यायचे का? मी नाही सांगितले. आणि तसाच बळचं चालत राहिलो. पावनखिंड चा बोर्ड दिसला आणि पायात अजून ताकद आली. समोर मोठे स्मारक दिसत होते. त्याच्या पाठी मागे पायऱ्या उतरून गेल्या नंतर नरवीर बाजीप्रभू देशपांडेंची समाधी आहे. तिथे वंदन केले.
मोहीम पूर्ण केले नंतर जो काय आनंद होतो तो शब्दात वर्णन करता येणारच नाही. सगळं शिन निघून जातो दुखणारे पाय दुखत नाही. अशा पद्धतीने मी निलेश सिद्धू आणि सुशांत ही मोहीम पूर्ण केली.
🙏🏻धन्यवाद🙏🏻
।। जय जिजाऊ जय शिवराय ।।"













Nice!!
ReplyDeleteArtistic Writing, it took me into the flashback of the trek..Hope to do this trek again👍
ReplyDeleteThanks!! Sure !!!
DeleteNice Partner...just keep it up ����������
ReplyDeleteThanks partner for motivation !!
ReplyDeleteप्रशांत चव्हाण निसर्गवेध परिवार
ReplyDeleteलिखाना सोबत जी मांडणी केली आहे ती अप्रतिम वाचन करत असताना ट्रेक केल्याची प्रचिती अली अप्रतिम उत्कृष्ट दमदार
धन्यवाद! छोटासा प्रयत्न!!
Deleteअविस्मरणीय क्षण .......
ReplyDeleteसुरेख. उत्कृष्ट लेखन. आपले हे फिरण्याचे वेड आणि त्यासोबतची प्रत्येक ट्रेकची माहिती आम्हाला देखील स्वतः फिरून आल्यासारखी भासवते..
ReplyDeleteYes khupach amazing experience hota
ReplyDeleteRamdas bhau, Nilesh sir, siddhu & m
.pawankhindichi ladhai zali tya same climate madhe amhi to experience ghetla,
Yes आयुष्यातील एक चांगला अनुभव !!
ReplyDelete