Sunday, April 12, 2020

Tadoba Wildlife Sanctuary - Bike Ride - January 17, 2018.



माझी बी.आर.सीबरोबरची १७ वी राईडतशा  ईव्हेन्ट वाल्याराईड खुप झाल्यातज्या दिवशी मधुरने ताडोबाची राईड प्रपोज केली त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी नाव ऐड केलमाझे  ११ वर्षा पूर्वीचे         स्वप्न पूर्ण   होणार होतेपरंतु लांब पल्याची राईड कधी केली नव्हती.  मधुरराहुल आणि प्रितम   यांच्या बरोबर राईड केलेल्या होत्या त्यांनी थोडा काँफिडन्स दिला तु राईड केलेल्या आहेत तु करु   शकतोमग मी सफारी बुकिंगसाठी पैसे जमा केलेराईडची तारीख होती १७/०१/२०१८ जवळ पास  आडीच महिन्यांनीसफारीराहाण्याची बुकिंग सगळं मधुरच करत होतासुरूवातीला राईडला   येणाऱ्यांची संख्या १४ होतीसफारी बुकिंग पण १४ जणांची केली होती

        शेवटी १७ तारखेला आम्ही सहाच जनं निघालो  मधुरधिरजराहुलयतिनराजिव आणि मी.




        पहिल्या दिवशी ७००किमीजायचं होतेमी एवढी लांब गाडी कधी चालवली नव्हती थोडे टेन्शन होतेचपहाटे .१५ वाजता आम्ही सगळे पोहोचलो मधुरने ब्रिफ केले.  यतिन लिड करणार मधुर स्विप आणि राहुल रनिंग पायलेट आसं ठरविले आणि .३० वाजता  राईड चालू झालीपहिला स्टॉप नगरला घेतला .०० वाजता आम्ही पोहोचलो होतोप्रवास छान होता मस्त थंडी होतीसूर्योदय खूप  सुंदर होतानाष्टा केल्या नंतर आम्ही पुन्हा राईडला सुरूवात केलीऔरंगाबाद मध्ये छोटा स्टॉप घेऊन   मॅपवर रोड बघुन घेतला आणि पुन्हा प्रवासाला सुरूवात केलीपुढील स्टॉप सिंधखेडराजेला केला.  आई जिजाऊंचे जन्म स्थानदुपारच्या .३०वाजले होतेतिथेच जेवण केलेथोडा वेळ आराम केला   .३०पुन्हा प्रवासाला सुरूवात केलीप्रत्येक १००-१२५किमी.नंतर आम्ही ब्रेक घेत होतो
संध्याकाळी .००वाजता आम्ही वर्धया मध्ये  पोहोचलोपहिल्या दिवशी आम्ही ७००किमीप्रवास    केला.स्टेशन जवळच रुम बुक केलीरुमवरच जेवण अॉडृर केलेजेवन ऐई परयंत आम्ही फ्रेश   झालोखुप थकून गेलो होतो.७००किमी प्रवास केला होतात्या मध्ये  जालन्यापासूनचा २००-२५० किमीरोड खुप खराब होताशेवटचे ४०किमीसंपता संपताच नव्हताजेवण आले आम्ही जेवण केलेसकाळी लवकर ऊठून पुन्हा प्रवास करायचा होताम्हणून आम्ही झोपून घेतले कधी झोप लागली  समजलेच नाही.




सकाळी .००वाजता ऊठलो फ्रेश होऊन समोरच्या हॉटेलात नाष्टा केला१०.०० वाजता प्रवासाला   सुरुवात केली.   १५०किमी जायचं होतसुरूवातीला रस्ता खराब होतानंतरचा हायवे  लेन होता.   हायवेवर आम्हीच सहाजनं होतो मग काय १२०-१३० च्या स्पिडने गाड्या पळवल्या मजा आली   पळवायला३०-४०किमीचा रोड होता तोनंतर 
पुन्हा खराब रोड पण तशा रोडवर सुध्दा आम्ही गाड्या पळवल्या११.३०वाजता रिसॉट   पोहोचलो.  रिसॉट खुप छान होतेते तंबुच होतेऐका तंबुमध्ये तीनजन आशे दोन तंबु बुक केलेफ्रेश झालो मधुर धिरज राजिव आणि मी गेटवर जाऊन चौकशी करून आलोदुपारचे जेवण करून आम्ही सफारीसाठी पुन्हा गेटवर गेलो .०० सफारी सुरूवात झालीएका जिप्सि मध्ये सहाजनं बसलो होतोपक्ष्यांचे   आवाज सुरू झालेधिरजने लगेच पक्ष्यांची नावे सांगायला सुरूवात केलीपुढे गेल्या नंतर मगर हरन सांबर आसे प्राणी दिसले











पुढे गेल्या नंतर डेवडोच्या राणीची (वाघिनहालचाल दिसलीदेवडोची राणी एका झाडाखाली झोपली होती आणि तिच्या बाजूला तिचे बछडे खेळत होतेबाजूच्या झुडपा मध्ये तिने एक शिकार करून   ठेवली होतीभूक लागली कि ते त्या शिकारीवर ताव मारून येतआम्ही खूप वेळ वाट पहिलीपण आम्हाला काय ती दिसली नाही ना तिचे 
बछडे दिसलेआम्ही पुढे जाण्याचा विचार केला आणि निघालोगाईड आम्हाला सर्व माहिती देत   होता.  आम्ही पुढे गेलो हरन सांबर गवा दिसलेसंध्याकाळी सहा वाजता आम्ही बाहेर आलोरिसॉट वर आलो नाष्टा केलारुमवर  गेलो फ्रेश झालो..शेकोटी पेटवून शेकत गप्पागोष्टी चालु झाल्यागणपत काकांनी ती व्यवस्था केलीरात्री उशीर पर्यंत   आम्ही शेकत बसलो होतोकोण काय करते कोणची फॅमिली किती मोठी आहे म्हणजे +?. राजीव आणि धीराजचे तर अजून लग्नाचं नाही झालेतआमच्या गप्पा मस्त चालल्या होत्या  वाटत होते आमची खूप जुनी मैत्री आहे आणि खूप दिवास्नी भेटत आहोतजिन्दगी  ना मेलेंगी दोबाराकोण कोणासाठी नवीन नव्हते . आकाशात चांदणे टिपूर पडले होते ते बघण्याचा आनंद काय वेगळाच असतोराहुल यतीनचा एक खूप भारी फोटो काढला त्याच्या साठी आम्हाला    खुप प्रयत्न करायला लागलेधीरज ला तर पक्षांची खूप माहितीपक्षाचं आवाज अलातरी तो   सांगतो अरे या पक्षाचे नाव हे आहेत्यानं पक्षांचे खूप भारी फोटो काढले आहेतराहुल ला पण फोटोग्राफी ची खूप आवड आहे . सगळं कशे  शांत स्वभावाचे कोणी चीड चीड  करणारे नाहीकोणाला   उरकायला उशीर झालेलं म्हणून ओरडणारे नाहीसमजून घेणारे समजून सांगणारेयतीनने    आम्हाला सांगितले  टूर्न वर ग्येर  कशे शिफ्ट करायचे स्पीड कमी करायचायेतंना याचा आम्हाला खूप फायद झाला.          दुसऱ्या दिवशी १९/०१/२०१८ दोन सफारी होत्या सकाळी .०० वाजता आणि दुपारी .०० वाजता.    सकाळचा नाष्टा आणि कॉफी जंगलात करायचं  ठरविलेतसं हॉटेल मधुन पॅकिंग  करून घेतले.  आज त्यागाईड ने आम्हाला  कालच्याच रोडने घेऊन गेला आजचा गाईड वेगळा होताआम्ही    कालच्या ठिकाणी आलो जिथे आम्हाला देवडीचे राणी दिसली होतीएका झाडा खाली  तिच्या    तोंडातून येणाऱ्या वाफा दिसत होत्याउंच वाढलेलं गवत होते म्हणून ती काय आम्हाला दिसत   नव्हतीतिचे बछडे नास्ता करण्या साठी शिकारी जवळ आले होतेआम्हाला त्यांचे थोडेसे दर्शन   झालेआम्ही जास्त वेळ  घालवता पुढे गेलो.
देओडोच्या राणी पासून आम्ही पूढे गेलोजाता जात रस्त्या मध्ये छोट्या तारा च्या परिसरातून चलो होतोतलावच्या पलीकडे तिचे अठरा महिन्याचे दोन बछडे होते दोन्ही नर आहेतअशी माहिती   गाईड ने आम्हाला दिली पुढे  गेल्या नंतर आम्हला हरणांचे कळप चरताना दिसलेकाही पक्षी दिसले.   पुढे गेल्या नंतर एका तळ्याच्या बाजुला काही जिप्सी थांबलेल्या होत्या.  आमच्या गाईडने दुसऱ्या गाईड विचारल्या नंतर समजले की सोनम आणि तीचे दोन बछडे काल या ताळ्यावर पाणीप्याला   अली होतीआता दिसण्याची शक्यता आहेआमच्या गाईड ने तिथेच थांबायचे ठरवलेड्रायव्हर ने  गाडी बंद केली . आम्ही आमच्या बरोबर आणलेला नास्ता बाहेर काढला सँडविच   आणि अंडी होतीआम्ही नास्ता केलानंतर गरमागरम कॉफीवाह काय मस्त नास्ता आणि कॉफी झालीते पण जंगलात असा अनुभव आमच्या साठी भारीच होताआम्ही बराच वेळ सोनम आणि  तिचे दोन बछडयांची वाट पाहिली पण ती काय पाणी प्याला आलीच नाही.  मग आम्ही  पुढे गेलो   जंगल मधून आमचा प्रवास चालूच होतोआजूबाजूला लक्ष देऊन आम्ही पुढे चाललो होतोकुठे  सोनम दिसती का बघत चाललो होतो.  पुढे गेल्या नंतर एक गवा दिसलातो पर्यंत सफारी संपण्याची वेळ झाली.  गाईड ने जिप्सी जंगलातून बाहेर घेलती आम्हला रिसॉर्ट वर सोडलेदुपारी चांगलेच   कडक ऊन होतेरिसॉर्ट मध्ये स्विमिंग  पूल होताआम्ही पोहण्याचा विचार केला आणि स्विमिंग   पुलवर गेलोपण पाणी खूप थंड होतेतरी आम्ही त्याच्यात उड्या मारल्याथोडे फोटो काढलेआणि   जेवण करायला गेलो पोहुन भूक लागली होतीजेवण केले तो पर्यंत दुपारच्या सफारीची वेळ झाली  होतीटेन्ट   मध्ये गेलो कपडे बदलली आणि.






  दुपारच्या सफारी साठी गेलोपरत आम्ही सकाळच्या ठिकाणीच गेलो.  देवडोची राणी दिसतीय का पहिलेपण ती काय दिसली नाही.  पुढे गेल्या नंतर ताराची दोन बछडे ताळ्यावर पाणी प्याला आले होतेगाईडने सांगितले ते जवळ पास अठरा महिन्यांचे आहेतते आमच्या पासून खूप लांब होते.  धीरजने त्यांचे  पाणी  पितानाचे खुप सुंदर फोटो काढले आहेतपण कॅमेराच्या लेन्स मुळे आम्हाला ते बघता आले.   आम्ही तिथेच थांबण्याचा विचार केला.   बाकीच्या पण जिप्सी तिथे आल्या होत्यासगळी कडे शान्तता होतीत्यांचे पाणी पिऊन झाल्या   नंतर ते रोडच्या दिशेने येत होतेतळ्याच्या बाजूला खूप गवत वाढलेले होतेत्या गवता मध्ये ते   घुसले.   त्या गवता मधून ते कधी बाहेर येतायत त्याची सगळे वाट बघत होतेफोटोग्राफर कॅमेराची सेटिंग करून वाट बघत होतेखूप मोठ्या मोठ्या लेन्स चे कॅमेरे होतेअंजूबाजूल हरण चरत होतीत्यांच्या अंगावर पक्षी बसलेलं होतेहरणं आणि वाघ   यांच्या मध्ये तसे खूप अंतर नव्हते.   ते गवतामधून बाहेर आले तसे कॅमेराच्या शटर्स कट कट असे आवाज याला लागलेते जिप्सी च्या खूप जवळ आले होतेइतक्या जवळून पहिल्यांदाच वाघ बघत होतोवाघ बघून खूप भारी वाटले.  असा वाघ पहिल्यांदा बघत होतोप्राणिसंघरालयातील वाघ आणि जंगलातील वाघ बघणे खूप फरक आहेआणि आम्ही जन्गलातील वाघ बघत होतोते १८ महिन्याचे होते तरी इतके मोठे दिसत होतेतरुण झाल्या नंतर किती मोठे दिसतील याचा विचार करत होतो  तिथे जिप्सी ची खूप गर्दी झाली होतीरोड पॅक झाला होतामागे एक बस अली होती तिला पुढे जायचे होते म्हणून आम्हाला निघावे लागले.





         थोडे फोटो काढून आम्ही पुढे गेलो पुढे गेल्या नंतर जंगलातील बाकीचे प्राणी  सांबरहरणगवावेग वेगळे  पक्षीमाकडं असे आम्ही  तरी पुढे गेल्या नंतर गाईडे ने सांगिलते कि या पॉईंट वर क्रोससिंग होतेम्हणजे रोड क्रॉस करून वाघ एक बाजूने दुसऱ्या बाजूला जातोत्या पॉईंट वर आम्ही थोडा वेळ थांबलोपण आम्हाला काय दिसलाच  नाहीरिसॉर्ट वर जय पर्यंत आम्ही गाईड बरोबर गॅप मारल्या . त्याने सांगितले कि  बफर झोन मध्ये पण वाघ  दिसतोमग काय आम्ही ला वाघ बघायची इच्छा झालीकिती मिळाले  तर माणसाचे समाधान होत नाही याचा  अनुभव आलाआम्हाला रिसॉर्टवर त्याने सोडले आम्ही फ्रेश होऊन कॉफी प्यायला गेलोटेन्ट मध्ये येऊन थोडा अराम केला आणि जेवण करायला गेलो उद्याच्या बफर झोनच्या सफारीची चौकशी केलीजेवण करून टेन्ट   मध्ये आलोउद्याच्या सफारी ला कोण कोण येणार याची चर्चा केलीमी धीरजराहुल आणि यतीन असे चौघे  जायला तयार झाले

            पण सकाळी तिघेच गेलो.  बफर झोन एरिया च्या सफारीचे बुकिंग आम्ही गेट वर जाऊन केले.   बफर झोन एरिया मध्ये मटकासुर आणि माया आहेजिप्सी मध्ये आम्ही तिघेच होतो तिथे अजून एक  मुलगा भेटलातो म्हणाल माझे मित्र मला सोडून गेलेत मी तुमच्या बरोबर येऊ का ? आम्ही तिघेच होतो म्हणून आम्ही त्याला पण  बरोबर घेतले.  आमची सफारी चालू झालीधीरज आणि   राहुल ने त्यांचे DSLR कॅमेरे बाहेर काढलेया बाजूचे जंगल खूप घनदाट आहेया एरिया मध्ये   अजून  पण काही गाव आहेततिथे लोक राहतातआम्ही जंगलातल्या रोड ने बाहेर आलो . समोर एक अस्वल आमच्या   दिसेनेच येत होतेआम्हाला थोडेच दिसलेआम्ही थोडे पुढे गेलो की ते जंगलात पळून गेलेआम्ही त्याला व्यवस्थित पाहू शकलो नाहीहे दोघेही फोटो काढण्यात. मग्न होतेमध्येच राहुल चा कॅमेरा बंद पडला . त्याच्या लक्षात आले की रात्री   गप्पांच्या नादात कॅमेराची बॅटरी चार्ज केलीच नाहीत्याची खूप चीड चीड झालीचांगले चांगले   फोटोस तो मिस करणार  होताआम्ही अजून पुढे गेलो तर गाईड ने एका झाडा जवळ गाडी थांबवलीत्या झाडावर नख्यांने ओरखडले होतेते   मटकासुर ने केलेल्या त्याच्या एरिया चे मार्किंग होतेज्या वेळेस वाघ जंगल मधून फिरत असतो त्या वेळेला तो असे   मार्किंग करत असतोपुढे आम्ही इराई तळ्याच्या बाजूला गेलो तिथे थोडी हालचाल दिसली होती   पण आम्ही त्या पॉईंट  ला पोचे पर्यंत उंच गवतातून माया ती जागा सोडून दुसरीकडे गेली आम्हाला काय दिसले नाहीअश्यात आमची सफारी   संपण्याची वेळ झालीगेट वर जाऊन आम्ही   आमच्या गाड्या घेऊन रिसॉर्टवर गेलो.
आम्ही सफारी वरून येई  पर्यंत हे तिघे रेडी झाले होतेआहि आमच्या बॅगा पट पट पॅक केल्याआणि नास्ता करायला गेलो. सकाळचा नाष्टा करून १२.३० परतीचा प्रवास सुरू केलाआम्ही परतीचा मार्ग वेगळा घेतला.  चंद्रपूर हैद्राबाद सोलापूर पुणे असा मार्ग घ्यायांचा ठरवले . चंद्रपुर हैद्राबाद सोलापूर   पुणे११५० किमीआहे.ताडबो चंद्रपुर रोड हा बफर झोन मधूनच होतहा रस्ता जंगला मधूनच जात होताआम्ही कमी स्पीड ने गाडी  चालवत होतोआजूबाजूला काय प्राणी दिसतात का बघत होतो.   असा आमचा प्रवास चालू होताएक एक गाव  मागे जात होतेआज हैद्राबादला जाऊन मुकाम    करायचा असे ठरवून आम्ही निघालो होतोदुपारी एक धाब्यावर जेवण करायला थांबलोजेवण   करून आम्ही नोघालो थोडे अंतर गेल्या वर राहुल ची गाडी बंद पडली.  थोडे प्रयत्न करून गाडी स्टार्ट केली आणि आम्ही निघालोपण स्पीड वाढवला की बंद पाडायचीअंधार पडायला सुरुवात   झाली होतीआमचा प्रयत्न होता की हैदराबाद ला जाऊन मुक्काम करायचारात्रीचे जेवण करायला एक धाब्यावर  थांबलोकाय करायचे ते ठरवलेजेवण करून आम्ही निघालो पण गाडी तशीच त्रास  देत होतीसगळ्याचे   सहनशीलता ची परीक्षा होतीसगळे शांत होतेकोण कोण वर चीड चीड करत नव्हतेरात्री उशीर   झाला होता.   बारा वाजले होते .हैद्राबाद अजून 125/150 किलोमीटर राहिले होतेसगळ्या नि विचार करून मुकाम करायचे   ठरवले . आम्ही हायवेवर होतो.  गुगल मॅप वर हॉटेल सर्च केलं आम्ही कामारेड्डी गावा जवळ होतोहायवे पासून 4 किलोमीटर वर हॉटेल होतं आणि पुढे गावआम्ही हॉटेल बुकिंग केले आणि हॉटेल वर गेलो.  आणि झोपलो   उद्या उठल्यावर ठरवू काय करायचंसकाळी लवकर उठून मधुर आणि राहुल गावात जाऊन मेकॅनिक शोध्ययला गेले . पण आज रविवारी होता सगळे गॅरेज बंद होते आणि बुलेट चा कोणी मेकॅनिक   नव्हताहैद्राबाद शिवाय   आम्हला पर्याय नव्हताते दोघे गावामधून येई पर्यंत आम्ही आमचे उरकुन घेतले आणि रेडी झालोते दोघे   आल्या नंतर आम्ही निघालो.  राहुल ची गाडी तशीच त्रास देत होतीसगळे पेशशने घेत होते कोणी कोणावर चीड चीड करत नव्हतेआता गाडी जास्तच त्रास द्याल लागलीएक झाड बघून आम्ही गाड्या साईड ला घेतल्यामधुरने राहुल ची गाडी खोलायची ठरवले टूल किट बाहेर काढले पूर्ण गाडी खोलली सगळे चेक केले पण प्रॉब्लेम काय  सापडला नाहीपरत सगळं जोडून घेतले आणि निघालो . जिथे बंद पडले असे वाटते तिथे मधुर राहुलच्या गाडीला पायाने ढकलत होताअसे करत आम्हला हैदराबाद ला पोचायला 12.30 –1.00 वाजलेआज रविवारी असल्या मुळे सगळे रॉयल इनफिल्ड चे शो रूम बंद होतेएक लोकल मेकॅनिक बघून आम्ही त्याच्या कडे गेलोआम्ही जिथे थांबलो होतो तिथपासून गॅरेज पर्यंत मी राहुलची गाडी चालवलीअंतर चार पाच किलोमीटर होतेयव्हढ्या वेळात मला समजले की राहुल कसा गाडी चालवत असेलसारखी बंद पडत होती बंद पडली की मधूर मागुन ढकलायचाअसे करत आम्ही   गॅरेज वर पोचलोमेकॅनिक ने गाडी खोलली त्याला पण प्रॉब्लेम सापडेनाखूप प्रयत्न केले त्याने . त्याच्या कडे त्याचा एक कस्टमर त्याची बुलेट घ्याला आला होता.   त्याने सांगितले की हेड लाईट ची वायरिंग चेक कराती चेक केले तर समजले की स्पीड मीटर ची   वायरिंग शॉर्ट आहेत्याच्या मूळे गाडी सारखी बंद पडत होतीप्रॉब्लेम सापडला होतामेकॅनिक ला गाडी जोडायला सांगितली  आणि




आम्ही पॅराडाइस ची प्रसिद्धी बिर्याणी खायला गेलोस्पेशेल बिर्याणी ऑर्डर केलीखुप भुक लागली होतीबिर्याणी स्वादिष्ट होती.  बिर्याणीवर ताव मारलाखाऊन झाल्या नंतर फोटो काढलेगॅरेज मध्ये रिटर्न आलो तो  पर्यंत गाडी तयार झाली होतीआता विषय होता मुक्काम करायचा का जायचंराजेश ला ऑफिस होत तो म्हणत होता आपण जाऊ उद्या मला ऑफिसला जायचे आहेबाकी कोणाचा प्रॉब्लेम नव्हताशेवटी नाय होय करत   आम्ही जायचे ठरवले निघायला 4 वाजले होतेआम्ही शहरा मधून बाहेर पडलो  पुणे अंतर 550    किलोमीटर होते . आम्ही रेस्ट करत गेलो तरी रात्री एक दीड पर्यंत आम्ही पुण्यात पोचलो असतो.   तेलंगाणा ची बॉर्डर सोडली आता महाराष्ट्र चालू झाला होताजसा महाराष्ट्र चालू झाला खराब रोड चालू  झालारोड चे काम चालू होतेरोड मध्ये  मोठे मोठे खडे होतेसमोरून ट्रक कार येत होत्या   डोळ्यावर लाईट्स येत होत्या समोरचे काही दिसत नव्हतेखडे चुकवत चुकवत आम्ही चाललो होतोतरी खड्यात जात होतोएका ठिकाणी ब्रेक घेतला मुक्काम करायचा का  जायचे याच्यावर चर्चा   झाली . नाईट राईड करायची असे ठरले तसे आम्ही निघालोरोड आणखीनच खराब होताअश्याच  एक खड्यात राहुलची गाडी आपटली.  


पाठीमागचे चाक जोरात आपटले खड्डा मोठा होताट्यूबलेस टायर होता म्यागव्हील रिम   होतीतिला कॅरॅक गेला त्याच्यातून हवा जात होतीरात्री चे 10 वाजले असतील आम्ही एक ढाबा   बघून थांबलो थोडं थोडे खाल्लेआणि धीरज जवळचा एअर पम्प काढला आणि टायर मध्ये हवा   भरली हवा जास्त भरली गेली नाहीआहे तेवढया हावेवर आम्ही निघालोआत्ता आम्ही पंक्चर   वाला शोधत होतोहायवेवर एक पण दुकान चालू   नव्हतेकिती किती दुकानाचे दार वाजवले असेल फोन लावलेऐकला त्याच्या घरी जाउन उठवुन  आणले पण   बुलेट आणि डिस्क ब्रेक बघून तो तयारच होईनाआम्ही अजून पुढे गेलोएका       धब्याच्या बाजूला एक जण सापडला त्याला उठवले रात्रीचे बारा वाजून गेले होते.  त्याला उठवले पण  तयार होईना . त्याला सांगीतले आम्ही टायर खोलून देतोमग तो तयार झाला

मधुर आणि राहुल ने टायर खोलायला सुरुवात केलीआम्ही बाजूला बसलोतयार खोलायला जास्त वेळ लागला नाहीपंक्चर वाल्याला  टायर आणि ट्युब दिलीत्याने दहा मिनिटात टायर तयार करून दिलाआता खरी  कसरत चालु झाली.  मधुर आणि राहुल चे टायर बसवायला सुरुवात केली . आमच्या चौघा पैकी कोण लाईट   दाखवत होते कोण पहाना देत होतेकाही केल्या टायर बसायला तयार नव्हताटायर बसला तर ब्रेक चे सेटिंग   होत नव्हते खूप प्रयत्न केलेतोपर्यंत यतीन ने कॅमेरा बाहेर काढून काही फोटो काढलेशेवटी ब्रेक  शिवाय टायर बसवलाआणि आम्ही निघालोखुप रात्र झाली  होतीकुठे हॉटेल दिसतंय का बघायला सुरुवात झाली सगळेच दमले होतेमुक्काम जरुरी होताकुठलेही हॉटेल आम्हला सापडले नाही.   शेवटी एक सरकारी विश्राम गृह सापडले तिथे आम्ही मुक्काम करायचे ठरवले.  तिथल्या केयर    टेकर ला उठवले त्याला विनंती करून एक रूम आम्ही घेतलीएक मोठा हॉल  होता तो दोन मोठे  बेडकोण बेडवर कोण फरशीवर झोपलेसगळे दामलेले होते लगेच झोपी गेलेआजदिवसभरात   सहनशीलता आणि एकी बघायला मिळालीकोणी चिडचिड करत नव्हतासगळे शांतपणे   एकमेकांना समजून घेत होतेराजेश ने पण त्याचा हट सोडला होता.  अश्या गोष्टींचा अनुभव    लांबपल्याच्या राईड माध्यमातून येतातअशी वेळ कोणावर पण येऊ शकतेम्हणून या राईड मध्ये आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो.            

मधुर बदल सांगावं तितके कमीतो आमचा लीडर शोभतोत्याला गाडीचे काय प्रॉब्लेम येऊ  शकतात हे  सगळं माहित आहेत तो पुर्न गाडी खोलून जोडू शकतोसगळ्यांना एकत्र करून सफारी   यशशस्वी  पुरण केलीशांततेत सगळ्यांचे म्हणणे ऐकून कुठला रास्ता चांगला आशु शकतो हे    पटवून देऊन प्रत्याकाच्या शंकेचं निरसन तो   करत होतात्याच्या विरोधात कोण जात नव्हता

     रायडर्स बरोबर राईड करणे किती आनंद देते ते त्यांच्या बरोबर राईड केल्या नंतरचा कळते.   त्यांच्यात  एक वेगळाच जोश असतोएकमेकांसाठी ते जीव द्याल तयार असतात बंधुता असती  त्यांच्यात ते कधी कोणाला संकटात सोडून जात नाहीकाही अडचणी आल्या  तरी लगेच उभे रहातातमग काही असो गाडीचा प्रॉब्लेम असोफॅमिली प्रॉब्लेम असो अजून काहीते रात्र बघत नाही  दिवस बघत  नाहीत मदती साठी तयार असतात.

          सगळ्यांना एकत्र करून सफारी यशश्वी पुरण केलीमधुर तुझे खूप खूप आभारअशाच आपण एकत्र खूप राईड करू.       आशा पध्दतीने ताडोबा जंगल सफारीचे स्वप्न मधुरने पुर्ण केलेसगळे आपल्या घरी सुखरूप   पोहोचले.   धन्यवाद मधुर आणि मित्रांनोधन्यवाद बी.आर.सीधन्यवाद सारंगअसा हा ब्लिट्झक्रीग राईडिंग क्लब पुणे.



धन्यवाद!!

15 comments: