बांधवगड राष्ट्रीय उद्यान बुलेट राईड (ब्लिट्झक्रीग रायडींग क्लब पुणे )
ही माझी दुसरी लांबची राईड. या राईडला मी कन्फर्म नव्हते केले. पण जाण्याची इच्छा होती. तीन महिने आधीच बुकिंग करायचे होते. तारखा कन्फर्म होत्या १५ जानेवारी ते २१ जानेवारी २०१९. मधुरने सांगितले सफारीचे बुकिंग कर, ते काय थोडेच पैसे आहेत यायचे का नाही ते नंतर ठरव. ऑफिस मध्ये सांगितले कि मला बांधवगडला जायचे आहे. मध्यप्रदेश मध्ये आहे. शैलेश अर्चना ने ओक सांगितले. मधुरला बुकिंग चे पैसे दिले बारा जणांनी बुकिंग चे पैसे दिले होते. वाटले या वेळेस खूप मज्जा येईल. बारा जण म्हणजे मोठा ग्रुप. पण जसे जसे दिवस जवळ येत चाललं लोकांची नाटक सुरु झाली. एक एक कमी होऊ लागला. शेवटी चारच जण राहिलो चौथा पण तळ्यात मळ्यात होता. पण शेवटी आला. मी रामदास लावंड, मधुर बोराटे, धीरज जाधव आणि आमय दांडेकर. मी मधुर धीरज आमची चांगली मैत्री झाली होती कारण आम्ही ताडोबाची राईड केले होती. आमय माझ्या साठी नवीन होता. आमची जास्त ओळख नव्हती. पण त्याने काही फरक पडणार नव्हता.
राईड चा दिवस उगवला १५ जानेवारी २०१९ सकाळी प्लॅटिनमला भेटायचे ठरले. सकाळी ५.३० ला भेटून ६ ला निघायचे ठरले. मी मधुर आणि धीरजला सकाळी ४ वाजताच उठवले. पण बाईकला बॅग बांधून निघे पर्यंत मला थोडा उशीर झाला. मधुर बरोबर ५.३० ला पोहचला होता मला पोहचायला ५.४० झाले होते. धीरज स्वारगेटला गेला होता. काही काम बाकी होते
ते पुर्ण करायचे होते, आदल्या दिवशी वेळ मिळाला नव्हता. तो ६.०० वाजे पर्यंत आला. थन्डी खूप होती. आमये खराडी बायपासला पोहचाल होता. पाच मिनिटामध्ये आम्ही निघालो.
एक सेल्फी काढला. मधुर धीरज ने ब्लूटूथ कनेक्ट केले धीरज लीड करणार आणि मधुर स्वीप. आम्ही खराडी बायपासला पोहचलो आमये पोहचलेलाच होता. त्याला ब्रिफ केले आणि निघालो. सकाळी ट्राफिक तसे कमी होते. आम्ही सूर्यदय झाल्या नंतर लहान ब्रेक घेतला आणि नगर मध्ये जाऊन नास्ता करायचे ठरवले. ७.३० ला आम्ही नगरमध्ये पोहचलो. नास्ता केला. ८.३०-८.४५ आम्ही निघालो आता डिरटेक्ट औरंगाबाद ला स्टॉप घ्याचा ठरवले त्याप्रमाणे आम्ही १०.३० ला औरंगाबादला पोहचलो. एका टपरी मध्ये कॉफी ऑर्डर केले आणि पुढील रोड कुठला मधुरने त्याच मॅप पहिला. कॉफी आली पण ऑफिस मध्ये हाटिव कॉफी ची सवय लागिली आहे त्या कॉफी ला काही चवच नव्हती. पण पर्याय नव्हता जशी होती तशी पैयली आणि अर्ध्यातासात निघालो. आता डायरेक्ट लंच ब्रेक. औरंगाबादच्या बाहेर एका पेट्रोल पम्पावर बाईक्स मध्ये पेट्रोल टाकले टॅंक फुल्ल केले. सकाळ पासून साधारण ३००.उ किमी . रनिंग झाले होते. टार्गेट नागपूर होते. म्हणजे अजून ५०० किमी. त्यानुसार बाईक चे स्पीड ठेवले होते १००-११० तरच ते टार्गेट पूर्णहोणार होते. आमये म्हणायचं कि माझी बाईक ८०-९0 च्या वर पळतच नाही. तरी त्याने लेह लडाख केले होते. तरी त्याला सांगितले कि स्पीड वाढव तर आपण आपल्या टाईम मध्ये पोहचू. १.३० वाजता सिंधखेडराजे जिजामातांचे जन्मगाव पास करून आम्ही एक ढाबा (रामभरोशे) बघून दुपारी जेवणा साठी थांबलो. व्हेज जेवण ऑर्डर केले.
जेवण येई पर्यंत आम्ही फ्रेश झालो. अमेयला चष्मा असल्यामुळे तो हेल्मेट चे वैसेर लावत नव्हता त्याचा चेहरा कार्बन पूर्ण काळा झाला होता. जेवण आले गरम गरम होते. अमेयने तिळाची गुल पोळी आणली होती. ते जेवण झाल्या नंतर स्वीट डिश म्हणून खाल्ली. खूप टेस्टी होती. मला ऑफिस मधलंय गुल पोळीची आठवण झाली जी अर्चना आणते. सेम टेस्ट होती. त्याच्या आईने खूप पोळ्या दिल्या होत्या त्या शेवट पर्यंत पुरवून खायचं अशे आम्ही ठरवले आणि शेवटच्या दिवसा पर्यंत रोज जेवण झाले कि खात होतो आणि अमेयच्या आईचे आभार मनात होतो. जेवण केल्यानंतर थोडा आराम केला ३.०० वाजता निघालो. रोड सिंगलच होते त्यामुळे स्पीड खूप कमी झाला होता. ५.०० - ५.३० ला टी ब्रेक घायचे ठरवले. कारंजी गाव मध्ये टी ब्रेक घेतला. ६.०० पुन्हा स्टार्ट आता अमरावती.
अमरावती मध्ये
आम्ही संध्याकाळी ७ वाजता पोहचलो असेल आजुन १४० किमी जायचे होते. रोड चार पदरी हायवे होता. आम्ही ठरवले कि नागपूर ला जायचे. आणि सुरुवात केली रोड मस्त होता. नवीनच होता रिफ्लेक्टर लाईट मध्ये रिफ्लेक्ट होत होते बाईक पळवायला मजा येत होती. ११०-१२० चा स्पीड होता. ट्राफिक खूप कमी होते. नागपूरच्या जवळ पोहचलायवर एक ढाबा बघून जेवायला थांबलो. सरदारजीच्या ढाबा होता. चिकन हंडी ऑर्डर केली. मस्त जेवलो. नागपूर आजून २५-३० कमी असेल. जास्त वेळ न थांबता आम्ही निघालो. ९ .०० वाजता नागपूर मध्ये पोहचलो. गूगल वर रूम शेअरच करून बुक केली. पण रूमवर पोह्चायला आम्हाला एक तास लागला कारण रूम अशा ठिकाणी बुक केली होती कि दुसरया दिवशी हाईवाय ला पोहचायला वेळ लागणार नाही. रूम वर पोहचलो. पहिल्या दिवशी चा प्रवास जवळ पास ७८५ किमी झाला होता. शरीर थकले होते रूम मध्ये जाऊन फ्रेश झालो. अंगावर कार्बन इतका होता कि विचारायची सोयच नाही. आमचे ठीक आहे पण आमये च्या फुपुसामध्ये किती कार्बन गेला असेल तो हेल्मेटचे वायझर बंदच करत नव्हता.
सकाळी लवकरच निघायचे असे मधुरने सांगितले होते. ६.००-६.३० निघू असे ठरले. आणि आम्ही झोपायला गेलो. कधी झोप लागली समजलाच नाही खूप थकलो होतो. सकाळचा अलार्म इतकया लवकर कसा काय वाजला असे वाटले. ६.३० उठलो अंघोळी केलाय. ७.३० ला चेक आऊट केली बाइक्स क्लीन केलाय चैनलूब सोडले आणि बॅग्स लोड केलाय. ८.०० वाजता हॉटेल सोडले. १०-१५ मिनिटं मध्ये हाईवाय ला पोहचलो. हाईवाय चार पदरी होता. ९.०० वाजत एका फूड मॉल मध्ये नास्त्या साठी थांबलो.
एक तास कसा गेला समजलाच नाही. आज ४५०-५० किमी जायचे होते. जबलपूर मार्गे जायचे ठरवले ९.३० ला निघालो आम्ही हाईवाय नवीनच होता. आम्ही पेंच अभयारणयातून जाणार होतो. दोन्ही बाजून जंगल आणि रोड काय मस्त होता. रोड मोकळा असल्या मुळॆ गाडी पळवायला मजा येत होती. मी आणि धीरज १२०-१३० ने पळवत होतो. मधूर ची गाडी १०० च्या वर जात नव्हती म्हणून तो खूप लांब राहायचा.
एका ठिकाणी आम्ही फोटो काढणाय साठी थांबलो होतो. आमचे फोटोशूट चालू होते. दुसरया साईड ने तीन साइकलवाले नागपूरच्या दिशेनं चालले होते आम्हाला बघून ते थांबले. त्यांनी आम्हाला बोलवले आणि हिंदी मध्ये विचारले कि तुम्ही कुठेले कुठे चालले. त्यांच्या कडे गोप्रोकॅमेरा होता तो कसा वापराईचा ते त्यांना माहित नव्हते. म्हणून त्यांनी आम्हाला आवाज दिला होता. बायकर्स लोकांना कॅमेराचा माहित असते हे त्यांना माहित असावे. ते तिघेजण कोल्हपूरचे होते एक काका ६२ वर्षाचे आणि दुसरे ६० वर्षाचे आणि आजुन एक जवान ४० वर्षाचा.
ते काश्मीर ते कन्याकुमारी सायकल वर करत होते आज १५ दिवस झाले होते त्यांनी सुरुवात करून. आम्हाला भेटून त्यांना खूप आनंद झाला कारण १५ दिवसात त्यांच्या बरोबर मराठी बोलणार कोणच भेटला नव्हता. पोल्युशन सोलुशन अशी त्यांचे ती सायकल राईड होती. दररोज ते १४०-१५० किमी सायकल चालवत होते. त्यांचा रात्रीचा मुकाम हा मंदिर किव्हा धर्मशाळेत असे. ते सायकल चालवुन पोल्युशन्स वर सोल्युएशन्स चा संदेश देत होते. आम्ही त्यांची विचारपूस करून निघालो कारण खूप वेळ गेला होता. आजचा प्रवास पण तसा खूप होता. रोडचे काम चालू होते स्पीड कमी होत होता. लहान लहान घाट होते. घाटात लॅप मारायला मजा येत होती. दुपारी एका ढाब्यावर जेवायला थांबलो. थंडीतर खूपच होती सावली मध्ये बसलो कि थांडी वाजायची आणि उन्हात बसलो कि चटके बसायचे.
जेवण उरकले थोडा अराम झाला आणि निघालो जबलपूर ला जायचे होते आणि तिकडने बांदवगड. जबलपूर पासून सगळा सिंगल रोड होता. त्याच्यात अमेय माघे राहिला आणि तो दुसऱ्या रोडने गेला. तो भेटे पर्यंत अर्धापाऊण तास गेला. शेवटी भेटला एकदाचा आणि त्याला सांगितले कुठला टर्न आला तरी टर्न घ्याचा नाही जो पर्यंत लीड सांगत नाही. सिंगल रोड ४.३० वाजलेले, थंडी, आणि आज बांदवगडला पोहचायचे होते. अंतर होते १२५ किमी. अंतर जास्त नव्हते पण रोड सिंगल, जंगलातून होता. एका गावात पेट्रोल भरले चहा प्याला थांबलो तर हा अमेय मी जातो माझी गाडी रात्रीची पळत नाही. त्याला थोडे समजून सांगितले आणि चहा प्याला आणि जास्त वेळ न थांबता निघालो. आम्ही चहा पियुन निघालो त्यावेळीस अंधार पडायला सुरवात झाली होती. जंगल
आणि घाट रास्ता होता. मी आणि आमये पुढे होतो
अमेय लीड करत होता. थोडासा उजेड होता म्हणून तो गाडी जोरात पळवत होता. पण या स्पीड मध्ये तो सूर्यास्थ बघणायचा आंनद
विसरुन फक्त अंधार पाड्याच्या आत मी किती अंतर कापू शकतो हाच विचार करत होता. माझी
इच्छा होती कि थांबून. फोटो काढावे पण हा पळतच होता. माघे धिराज आणि मधुरने थांबून
खूप सुंदर फोटो काढले.
थोडा
अंधार पडल्या नंतर आमये ने स्पीड कमी केला. तो पर्यंत माघुन हे दोघे आले. आता आम्ही एकत्र एका माघे एक असे चालो होतो, आता लीड
धीरज करत होता नंतर मी आणि माझ्या मागे अमेय मधुर स्वीप. समोरून ट्रक, कार येत होत्या
डोळ्यावर खूप लाईट येत होता. ते कधी डीपर देतच नव्हते त्यावेळेस समाजातच नव्हते डोळे
झकले जायचे. काही ठिकाणी वळणे तर इतकी शार्प
होत कि समजाईचीच नाही. व्हयब्रेशन ने माझा
गाडीचा डाव्या बाजूच आरसा पडला. माझ्या हाताला काय तरी लागल्या सारखे मला वाटले, नंतर
बघतो तर आरसाच पडला होता. स्पीड इतका होता कि थांबून तो उचलण्या साठी वेळे पण घालवायची
इच्या झाली नाही. एकतर जंगल होते आणि खूप थंडी होती. न थांबता तसाच पुढे गेलो.
रोड सगळा जंगलातूनच होता. लहान लहान घाट होते कुठे टूर्न येतोय समजत नव्हते. पण तरी स्पीड ९०-१०० होताच. शहापूर उमरिया अशी गावे लागली. ८.३० वाजता आम्ही बांधवगड ताला गेट ला पोहचलो. तापमान होते ५ डिग्ग्रे आम्ही थंडीने थडथड उडत होता. इंजिन जवळ हात घेऊन गेलो तरी ते गरम जाणवत नव्हते. चौकशी केली आमचे रेस्टहाऊस आजुन ५ किमी होते. आजून ५ किमी असे वाटेल इथे जवळच का नाही बुक केले. जास्तवेळ न घालवता आम्ही
निघालो ते ५ किमी जाईल आम्हाला १५-२० मिनिट्स लागले जंगलात होते ते कुठे तरी. रिसॉर्टवर
आम्ही पोहचलो. रेसॉर्टचे मालकांचे नाव आनंद देव होते.
रूम बघितल्या, एक घ्याची का दोन डिसकस झाले आणि एक घ्याची ठरली. बाइक्स वरचे सामान सोडले रूम मध्ये पोहचवले. जेवणाची
ऑर्डर दिली. आणि आम्ही रूम वर फ्रेश होईला गेलो. सफारी बुकिंग आणि कॉन्फरमेशन आदल्या दिवशीच करायचे असते असे आनंद सांगितले. मग लगेच
आम्ही आमचे आईड्प्रूफ, सफारीबुकिंग रीसेट आणि पैसे दिले. आनंदने तिकडे जाऊन लगेच आमची
सफारी बुक केली. सकाळी ६ वाजता जिप्सी घ्यायला येणार असे सांगितले. रूम मध्ये पण खूप
थंडी होती. आम्ही सर्विस बॉयला रूम मध्ये रूम हीटर लावायला सांगितला. त्याने कपाटातून
हिटर काढून लगेच लावला मी आणि मधुर हीटर जवळच बसलो पण फरशी खूप थंड होती मग मी फ्लोअर
मॅट घेऊन त्याच्यावर बसलो.
सकाळी ५.०० चा अलार्म लावला आणि झोपी गेलो.
Part II Cont..
Nice keep Going!!
ReplyDeleteखूप छान.. राम
ReplyDeleteखूप छान.. राम
ReplyDeleteअदभुत
ReplyDeleteAwesome
ReplyDeleteKeep it up Ram...
ReplyDeleteThansk!!!
Deleteछान लिहलास, मी हे ड्राईव्ह केलाय त्यामुळे कनेक्ट करू शकतोय. पुढचं वाचायचं, पूर्ण करा.👌👌👌
ReplyDeleteVery nice ������ Keep it up ������
ReplyDeleteI hope next time your name will be 1st in the list .. Ramdas
ReplyDeleteYes Thanks!!
DeleteI cant see your name
DeleteKeeep going!! Mastach
ReplyDeleteMast 👍
ReplyDeleteBharich yaar
ReplyDeleteVery nice...just keep it up ����������������
ReplyDelete