Thursday, May 21, 2020

!! लिंगाणा एक आव्हान !! ३ जानेवारी २०१८.


 "लिंगाणा"

"लिंगाणा" सह्याद्रीमधील एक अतिशय अवघड किल्ला. मागे सांगितल्या प्रमाणे निलेश मला फोन करतो, पार्टनर आपल्याला लिंगाणा करायचा आहे. खूप अवघड किल्ला आहे तूला थोडी शाररिक स्ट्रेंथ वाढवावी लागले. थोडा व्यायाम कर. आम्ही या लिंगाण्याचे गिर्यारोहण भगवान चवले यांच्या सोबत बरोबर करणार होतो. यंदा भगवान दादांची एव्हरेस्ट मोहीम असल्याने त्यांने शुल्क कमी ठेवले होते. तारीख होती जानेवारी २०१८.

 

          लिंगाण्या साठी मी, निलेश, काजल (भाची) आणि तेजस असे आम्ही चौघांनी आमची नावे देऊन आमची जागा फिक्स केली. चाळीस जणांचा ग्रुप होता.

जानेवारी ला रात्री ११.०० वाजता पिकअप पॉईंट वरून बस निघणार होती. रात्रीचा मुक्काम "मोहरी" गावात करायचा होता. त्यानुसार मी माझी तयारी सुरू केली. धावण्याच्या सराव तर आधी पासून करतच होतो. थोडासा हाताचा रग वाढवण्यासाठी सोसायटीच्या जिममध्ये जायला सुरुवात केली.

          नेमके ज्या रात्री आम्हाला ट्रेकला निघायचे होते त्याचं दिवशी एक महत्त्वाचे काम होते, ते ही मुंबईत. 'मुंबई की ट्रेक' असा पेच पडला. शेवटी दोन्ही गोष्टी करायच्या म्हणून 'सकाळी मुंबई - रात्री ट्रेक' असे नियोजन केले. जवळपास एक महिन्या पासून करीत असलेली तयारी फळास येणार होती.

           शेवटचा पिकअप पॉईंट "नऱ्हे" पुला जवळ होता. काहीकरून मला तिथे १०.४५ ला पोचायचे होते. मे केलेले नियोजन माझ्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांना सांगितले. काही करून आपण १०.३० ला पुण्यात पोचले पाहिजे. मी सकाळी घरातून निघताना ट्रेकिंगची बॅग घेऊनच निघालो.

           माझा प्रॉब्लेम सुटला. आता 'काजलचा' प्रॉब्लेम ती माझ्या बरोबरच येणार होती. तिला अडचण सांगितली आणि 'तेजस' बरोबर यायला सांगितले. तो हडपसर मधूनच येणार होता आणि ती बी टी कवडे रोडवरून...

त्याला फोन करून सांगितले की तू काजल ला घेऊन ये. निलेश डायरेक्ट येणार होता. तसे आम्ही एकमेकांना सांगितले. मी शेवटच्या स्टॉपवर थांबतो असे सांगितले.

          मी तारखेला सकाळी .३० ला  ट्रेकच्या तयारीने घरून निघालो. मुंबईचे काम उरकुन आम्ही सायंकाळी वाजता मुंबई मधून निघालो. बरोबर .३० ला आम्ही वाकड मध्ये पोचलो. हॉटेल मध्ये जेवण करून बरोबर १०.३० वाजता यांनी मला 'नऱ्हे' पुल जवळ सोडले आणि मी माझ्या वेळेमध्ये पोहोचल्याचा आनंद झाला. मला शुभेच्छा देऊन अर्चना आणि शैलेश निघून गेले.

           मी बसची वाट बघत थांबलो 'निलेश' ला फोन करून सांगितले की मी स्टॉप वर पोचलो आहे. काजल आणि तेजस पण बस मध्ये बसले होते. थोड्या वेळात बस आली आणि मी आणि माझ्या बरोबर नऱ्हे गावातील एकजण होता. आम्ही दोघे बस मध्ये बसलो 'भगवान' दादांनी शेवटचा काऊंट घेतला आणि प्रवास चालू झालामी तर झोपून घेतले सकाळी लवकर निघालो होतो. रात्री दीड दोन वाजता आम्ही मोहरी गावात पोचलो. कधी कसे पोचलो मला काय समजलेच नाही.

          आम्ही बसमधून उतरलो बस एका घरा जवळ थांबली होती. भगवान दादांनी सगळ्यांना सकाळी लवकर उठायचे आहे असे सांगितले आणि घराच्या बाजूला मोकळ्या जागेत झोपायला सांगितले. महिलांसाठी घरामध्ये व्यवस्था केली होती. बाहेर खूप थंडी होती. सपाट जागाबघून अंथरून टाकुन आम्ही झोपलो. आकाशनिरभ्र होते. चांदण्या चम चम चमकत होत्या. खुप वर्षानंतर असा अंगणात झोपत होतो. तारे मोजता मोजता कधी झोप लागली ते समजलेच नाहीपहाटे .३० वाजता सगळ्यांना उठवण्यात आले. ब्रश केले फ्रेश झालो. तो पर्यंत चुलीवर चहाचे आधण ठेवले होते.

          भगवान दादांच्या शिलेदारांनी प्रत्येकास हेल्मेट, हर्णेस आणि बिले असे सेफ्टी किट दिले. अंधारच होता ज्यांचा चहा पिऊन झाला आहे त्यांना पुढे जायला सांगितले. आम्ही पण सुरुवात केली पंधरा वीस मिनिटात आम्ही बोराट्याच्या नाळे जवळ पोचलो अंधार होता बॅटरीच्या उजेडात आम्ही ती नाळ उतरत होतो

नाळ उतरेपर्यंत उजेड पडायला सुरुवात झाली होती. ती नाळ सरळ खाली जात होती. अर्ध्यावर गेल्या नंतर उजव्या बाजूने रायलिंग पठाराच्या कपारी कपारीने आम्ही चालत होतो. डाव्या बाजूला खोल दरी होती. समोर उंचच्या उंच लिंगाणा दिसत होता. सूर्याच्या कोवळ्या किरणांच्या प्रकाशाने 'लिंगाणा' सोनेरी दिसत होता.

          वाजता आम्ही लिंगाणा माचीवर पोचलो होतो. भगवान दादांच्या शिलेदारांनी पुढे जाऊन रोप बांधुन ठेवलेला होता. हा किल्ला कुठल्याही सुरक्षा-साधनां शिवाय चढणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे. कारण जी वाट वरती जाते ती खूप निमुळती आहे. दोन्ही बाजूला खोल दरी आणि जंगल आहे. वाट पण घसरडी आहे. हे सगळं समोर दिसत होते. जे अगोदर पोचले होते त्यांनी चढाईला सुरुवात केले होती. भगवान दादांनी सगळ्यांचे बिले, हर्णेस तपासून घेतले आणि पुढे पाठवले



आम्ही सगळ्यात शेवटी होतो. पुढे सगळ्यांची रांग लागलेली होती. आम्ही .३० वाजता चढाईला सुरुवात केली दोन्ही बाजूला खुप खोल दरी होती. दादांनी सगळ्यांना ताकीद देऊन ठेवली होती की काही झाले तरी रोप मधून बिले काढायचे नाही. आम्ही हळू हळू पुढे सरकत होतो. काही ठिकाणी उंच कडे होते त्यामुळे त्याठिकाणी वरती चढायला उशिर लागत होता. थोडे वरती गेल्या नंतर जोरात हवा सुरू झाली होती. तोल जात होता. खाली पाहिले तर खोल दरी दिसत होती. कडा चढताना चांगलाच कसं लागत होता. माझ्या हाताची ताकत कमी पडत होती.

 

          आम्ही मध्यावर पोचलो होतो. उजव्या बाजूला एक गुहा आणि डाव्या बाजूला पाण्याचे टाके आहे. आम्ही ती गुहा जाऊन पाहिली. त्या गुहे मध्ये कैदी ठेवत असत. आम्ही काही फोटो काढले. समोर रायलिंग पठार दिसत होते. पुढे चढाईला सुरुवात केली. आम्ही चौघे एका मागे एक असेच चालत होतो. जस-जसे वर जात होतो तस-तशी दरी खूप खोल होत होती

आमच्या समोर जे वरती चढत होते त्यांची अवस्था आम्ही बघत होतोप्रत्येक जन जपूनच पाऊल टाकत होताएकमेकांना प्रोत्साहन देत आमचे गिर्यारोहण चालू होतेमला तर प्रोत्साहनाची खूप गरज भासत असे आणि  काम निलेश करत होता.

आम्हाला लिंगाण्याच्या माथ्यावर पोचायला १२ वाजले असतील . सगळ्यात शेवटी आम्ही पोहोचलो होतो. समोर एक काका शीर्षासन करून लिंगाण्याला वंदन करत होते.लिंगाणा चढणे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्नं असते. ते आम्ही पूर्ण केले होते. माथ्यावर पोचल्यावर सगळं थकवा निघुन गेला. आनंद गगनात मावेनासा झालामाथ्यावर पोचल्यावर सकाळपासून अंगात असलेले हर्णेस, हेल्मेट काढून ठेवले. आजूबाजूला नजर फिरवली तर तोरणा, राजगड, रायगड किल्ले दिसत होते. या माथ्यावरुन संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवता येत होत. म्हणून या किल्ल्याला स्वराज्यात अनन्य साधारण महत्त्व होते. काजलने आणि निलेश ने जे काही बरोबर आणले होते ते आम्ही पटा-पट खाऊन घेतले. थोडा आराम पण केला

भगवान दादांना सांगून आम्ही परतीचा प्रवास चालू केला. बाकीचे अजून बसलेलेच होते. काहींचा फोटो सेशन चालू होते. आम्ही सगळ्यात शेवटी पोचलो आणि सगळ्यात पहिल्यांदा निघालो. 

          मी, काजल, निलेश आणि तेजस निघालो. पहिला टप्पा आम्ही रॅपलिंग करून उतरलो. रॅपलिंग करताना हाताची ताकत कमी पडत होती. म्हणून आम्ही रॅपलिंग करता दोरीच्या मदतीने उतरलो. आमच्या तिघांचा उतरण्याचा वेग जास्त होता. तेजस आमच्या पासून मागे राहिला होता. आमच्या जवळ चे पाणी संपले होतेमध्यावर आल्या वर डाव्या बाजूला जे पाण्याचे टाके आहे त्याच्यातून पाणी पिले. पाणी खुप थंड आणि चविष्ट होते. बिस्लरीच्या पाण्याला या पाण्याची सर नाही. पोटभर पाणी पिले आणि भरून पण घेतले आणि निघालो. उतरतताना मला जास्त त्रास होत नव्हता. त्यामुळे आमचा उतरण्याचा वेग पण जास्त होता. गर्दी काहीच नव्हती सगळे अजून मागेच होते. दीड पावणेदोन तासात आम्ही उतरलो होतो. हर्णेस, हेल्मेट काढून बॅगेत ठेवले. थोडावेळ थांबलो, बाकीच्यांनी आत्ता कुठे उतरायला सुरुवात केली होती. तेजस खूप लांब राहिला होता. तो फोटो काढत निवांत उतरत होता. आम्ही चालायला सुरुवात केली रायलिंग पठाराच्या कड्याच्या बाजूनी आम्ही चालत होतो. उजव्या बाजूला खोल दरी होती.


  थोड्याच वेळात आम्ही बोरट्याच्या नाळे जवळ पोचलो. जी पहाटे अंधारात आम्ही उतरलो होतो. आता तिचे रौद्ररूप दिसत होते. मोठ-मोठाले दगड त्या नाळे मध्ये होते. पावसाळ्यात पठारवरचे आणि डोंगरावरचे पाणी या नाळे मधुन खोल दरीत जात होते. आम्ही ती नाळ चढत होतो. नाळ चढून गेल्यावर, थोडे चालल्यावर आम्हाला आमची बस दिसली. आम्ही सायंकाळी :४५ ला बस जवळ पोचलो.

           आमचे गिर्यारोहण पूर्ण झाल्याचे खुप आनंदी झालो होतो.


!! जय शिवराय!!

  !!धन्यवाद!!
 

Monday, May 11, 2020

कात्रज ते सिंहगड(K2S) ०७/१२/२०१९.... कात्रज ते सिंहगड- सिंहगड ते कात्रज(K2S-S2K)१४/१२/२०१९...

कात्रज ते सिंहगड(K2S) ट्रेक ०७/१२/२०१९....

हा ट्रेक म्हणजे सर्व ट्रेकर्स चा आवडता ट्रेक. मी आणि निलेश सिंहगड-राजगड-तोरणा-रायगड(SRTR)हा ट्रेक करणार आहोत. त्याची प्रॅक्टिस म्हणून आजचा हा कात्रज सिंहगड(K2S)ट्रेक.  मी या ट्रेकच्या अगोदर सात वेळा आणि निलेशने आठ वेळा ट्रेक केला आहे, एक वेळेस  दिवसा केलेला.विद्या माझी बहीण आणि निलेश ची बायको आहे.  तिने हा ट्रेक तीन वेळेस केला आहे. शौर्य निलेश चा मुलगा 10 वर्षाचाच आहे त्याने दोन वेळेस केला आहे. प्रत्येक वेळेस रुक्मिणी (बायको) चपाती , शेंगदाण्याची चटणी, खारे शेंगदाणे आणि गोड डीश म्हणून रव्याचे लाडू हा ठरलेले मेनू. मी तीला सांगितले की मला ट्रेक ला जायचे आहे, की हा ठरलेला मेनू तयार ठेवते.  प्रत्येक वेळेस कमीत कमी १५-२० ट्रेकर्स असायचे. पण या वेळेस मी आणि निलेश  दोघेच होतो.  निलेशच्या मैत्रिणीचा एक १० जणांचा ग्रुप होता.


कात्रज  बोगद्या जवळ आम्ही रात्री १० वाजता पोहचलो होतो. तो ग्रुप आमच्या अगोदरच पोहचला होता. ग्रुप लीडर बरोबर  त्या मैत्रिणीने ओळख करून दिली आणि ते निघाले.  त्यांना आम्ही सांगितले कि तुम्ही वाघजाई माता  मंदिरा जवळ थांबा आम्ही येतोच. आम्ही १०-१५ मिनटात पोहचलो पण ते मंदिरा जवळ थांबले नव्हते. आम्ही आमचा नेहमीचा सेल्फी काढला आणि सुरुवात केली. अजून ट्रेक ला सुरुवात नव्हती झाली म्हणून पायवाट काय दिसत नव्हती. गवत  खूप वाढलेले होते. आम्ही पुढे गेलो तरी आम्हाला तो ग्रुप कुठे दिसत नव्हता. आम्ही पण थोडी वाट चुकलो पण आमच्या लक्षात लगेच आले आणि आम्ही टेकडीच्या दिशेने जायला सुरुवात केली. मी खूप दिवसा नंतर ट्रेक करत होतो. आम्ही पहिली टेकडी  चढून गेलो तरी. तो ग्रुप कुठे दिसत नव्हता. अजून एक टेकडी चढून गेल्यानंतर दोन टॉर्च चे उजेड दिसू लागले. आम्ही आमचा स्पीड वाढवला. आणि एक तास नंतर आम्ही त्यांच्या जवळ पोहोचलो आणि लक्षात आले कि हा तो ग्रुप नाहीच हा दुसराच ग्रुप आहे . निलेशने त्यांच्या मैत्रणीला फोने लावला नेटवर्क नसल्यामुळे फोने लागायला वेळ



लागला. आणि ते वाट चुकल्याचे समजले  जण तिच्या बरोबर होते आणि दुसरे जण वाट शोधत होते. वाट सापडणे अवघड होते गवत खूप वाढले होते. त्यांना आम्ही सांगितले आम्ही पुढे जातो. या ग्रुप बरोबर आम्ही आमचा ट्रेक चालू ठेवला. हा ग्रुप चार जणांचा होता..दोन मुले आणि दोन मुली. हडपसर आणि कोंढव्यातले  होते.त्यांच्यातली एक जोडी(किरण साखरे आणि शितल) आमच्या बरोबर आली आणि एक आमच्या मागे होती. या वेळेस आमचा स्पीड बऱ्यापैकी चांगला होता. सगळीकडे गवत खूप वाढले होते रातकिड्यांचा किर्रर्र आवाज येत होता. पण आम्हाला रस्ता नेहमीचाच वाटत होता. एका मागून एक टेकडी चढून उतरून आमचा प्रवास चालूच होता. आमच्या बरोबर हि जोडी असल्या मुळे आमचा स्पीड थोडा कमीच झाला होता. त्यांना रस्ता माहित नव्हता आणि त्यांना मधेच सोडताही येत नव्हते. त्यांना घेऊनच आम्ही चाललो होतो. त्यांना ट्रेकचा थोडा अनुभव होता म्हुणून ते आमचा बरोबर चालले. या वेळेस आम्ही जास्त ब्रेक घेतले नाहीत. रात्री .०० वाजता आम्ही एक १५ मिनिटांचा ब्रेक घेतला. जो काय जेवणाचा डबा घेऊन गेलो होतो ते खाल्ले आणि लगेच निघालो. .या वेळेस टेकडी उतारावर गवत असल्या मुळे उतरताना  घसरत  नव्हते. वातावरण थंड आणि प्रसन्न होते. ब्रेक घेऊन पुढे गेल्या नंतर सिंहगड कडून कात्रज कडे जाणार दोघेजण भेटले त्या वेळेस साधारण .३० वाजले होते. त्यांनी .३० वाजता कात्रज पासून ट्रेक चालू केला होता. दोन वाजता ते कोंढणपूर फाट्यावर पोहचले होते. थोडा आराम करून ते पुन्हा निघाले होते. सिंहगड कात्रज त्यांच्या पैकी अजून एक जण कोंढणपूर फाट्यावर थांबला होता. त्यांना भेटून आम्ही लगेच निघालो. ती जोडी आमच्या बरोबर होतीच त्यांना अजून एक टेकडी अजून एक टेकडी असे करत आम्ही १६ लहान मोठ्या टेकड्या चढून उतरून   .४५  कोंढणपूर फाट्यावर पोहोचलो. एक सेल्फी  काढला. .३० तासात आम्ही पोहोचलो होतो. ती जोडी नसती तर अजून लवकर पोहोचलो असतो. भेटलेला दोघांचं मित्र(विशाल ठोंबरे) तिथेच फाट्यावर भेटला. ते दोघे  दमले होते. माझी  गडावर जायची इच्छा होती. इतर वेळेस मोठा ग्रुप असतो सगळे दमलेले असतात. कोणाची इच्छा असते कोणाची नसते. आज तसे नव्हते आज मी जायचे ठरवले होते. तिथे थांबून पण काय उपयोग नव्हता. पायथ्याला जाणाऱ्या गाड्या .३०- ला असतात आणि पायथ्या पासून बस पण उशिरा असते इतकं वेळ थांबून काहीच उपयोग नव्हता.कोंढणपूर फाट्यापासून गड किलोमीटर आहे म्हणजे साधारण ४५ मिनटे लागतील पोहचायला आणि पुणे दरवाजा पासून खाली आतकरवाडी -.३० ला पोहोंचू. विशाल पण तयार झाला. त्या दोघांना पण तयार केले आणि आम्ही पाच जण गडाच्या दिशेने निघालो. रोडचे काम चालू होते. म्हणून घाट रास्ता बंद होता. आम्ही चालायला सुरवात केली. तसं तर मी दमलेलो होतो पण गडावर जाईची इच्छा मला चालवत होती. आम्ही वाजता पुणे दरवाजा पर्यंत पोहचलो.  लिंबू-सरबत घेतले आणि .१५ ला खाली उतरायला सुरवात केली. खाली उतरणारे आम्हीच  होतो. गडावर येणाऱ्या लोकांची गर्दी चालू झाली होती. आज SRT ट्रेल मॅरेथॉन होती त्या मुळे थोडी जास्तच गर्दी होती. माझे पाय दुखायला लागले होते माझा स्पीड कमी झाला होता. तरी खाली उतरायचे होते काही पर्याय नव्हता. निलेश माझ्या अगोदर पोहोचले होते मला पोहोचायला वेळ लागला मी .३० वाजता पोहोचलो. अशा रीतीने आम्ही कात्रज सिंहगड (K2S) ट्रेक तासात पूर्ण केला. टोटल अंतर २०किलोमीटर झाले होते.ट्रेक पूर्ण झाल्या नंतर जो आनंद झाला होता तो शब्दात सांगता येणार नाही.घरी निघताना किरण आणि शितल यांनी आमचे आभार मानले.त्यानंतर सर्वांनी एकमेकांची रजा घेतली.

येत्या १४ तारखेला एकाच रात्री K2S करुन परत S2K करायचा दृढ निश्चय केला आहे.

        ।। जय जिजाऊ जय शिवराय ।।

 


#K2S2K#

(कात्रज ते सिंहगड- सिंहगड ते कात्रज)

#नुसतीच तंगडतोड#

१४/१२/२०१९....

गेल्या शनिवारीच(०७.१२.१९) आम्ही K2S केला होता पण या वेळी S2K पण करायचाच असा निर्धार केला होता.

मग ठरल्या प्रमाणे आम्ही शनिवारी(१४.१२.१९) रात्री .४५ मिनीटांनी श्री वाघजाई माता मंदिर पासून K2S ला सुरवात केली. ट्रेकला मी निलेश सिद्धू आणि दीपक असे चौघे होतो. टार्गेट होते के जितके लवकर आपण कोंढणपूर फाट्यावर पोहचू तितकेच लवकर रिटर्न येऊ शकू. आम्ही नॉनस्टॉप सुरवात केली जोश तर खूप होता की आज आपण K2S2K करणार आहे. पहिली टेकडी चढत असताना माघे - बॅटऱ्यांचे उजेड दिसू लागले. तसं आम्ही आमचा स्पीड वाढवला. सिद्धूने  टेकड्या मोजायला सुरवात केली. त्याचे कॉऊंटिंग चालूच होते. दीपक चा पाय थोडा दुखत होता तरी तो चालत होता.मला सुरवातीला काही त्रास झाला नाही पण शेवटी शेवटी माझापण पाय दुखायला लागला त्यामुळे माझा स्पीड कमी झाला. मागच्या शनिवारीच या रूट वरून गेलो होतो म्हणून आम्ही भरभर चाललो होतो. उंच टेकडी चढून गेलो कि थोडा वेळ थांबायचो. असे करता करता आम्ही राञी .३० वा. कोंढणपूर  फाट्यावर पोहोचलो.आम्ही नॉनस्टॉप ४तास ४५ मिनिटांत फाट्यावर पोहोचलो होतो. मी आणि दिपक पूर्ण थकून गेलो होतो. तिथल्या हॉटेलच्या कट्यावर मी आणि दीपक लगेच झोपलो आणि सिद्धू आणि निलेश ची चर्चा चालू झाली की या दोघांचे काय खरा नाही.आपण दोघे रेटून चालू करू. तरी निलेश ने .३० अलार्म लावला आणि त्यांनी पण थोडा आराम केला.आम्ही दोघे लगेच झोपी गेलो. .१५ वाजता निलेश ने आम्हाला उठवायला सुरवात केली. दिपकच्या मनात तर नव्हते रिटर्न जायचे तो माझ्या भरवस्या वर होता. मी नाही म्हंटलं तर त्याचे कॅन्सल होणार होते. पण मी तयार झाल्या नंतर दिपक पण तयार झाला. पहाटे .०० वाजता आम्ही तयार झालो आणि आमचा परतीचा प्रवास चालू झाला. आलेल्या वाटेने परत जायचे होते. असे करणारे खूप तुरळक असतात.आता पर्यंत आम्ही -१० वेळा K2S  ट्रेक केला पण मागच्या ट्रेकला रिटर्न ट्रेक करणारे  दोघे आम्हाला भेटले होते आणि त्यांना पाहूनच आम्ही #K2S2K# करण्याचा निश्चय केला होता. ज्या टेकड्या आम्ही चढलो त्या उतरायच्या होत्या आणि ज्या उतरलो होतो त्या चढायच्या होत्या . असा आम्ही पहिल्यांदाच करत होतो.रिटर्न मध्ये सुरवातीच्या टेकड्या उतरायला खूपच उतार असलेल्या आणि घसरडया आहेत. जसजसे आम्ही पुढे जाऊ लागलो तस- तसे K2S करणारे आम्हाला भेटू लागले. आणि विचारू लागले तुम्ही  रिटर्न  चाललाय काय..अजून किती राहिले आहे. जो तो भेटणार असे प्रश्न विचारात होता. काही त्यांच्यातले त्यांच्यात चर्चा पण करत होते अरे K2S करून S2K करणारे पण आहेत असा कधी विचारपण केला नव्हता. प्रत्येकाला आश्चर्य वाटत होते. आमचे अभिनंदन करून शुभेच्या देत होते. आम्ही येताना कुठे काही खाण्यासाठी थांबलो नव्हतो आणि  पोहोचल्यावर कोंढणपूर फाट्यावर पण काहीच  खाल्ले नव्हते.- टेकड्या चालून गेल्या नंतर मला भूक लागली.तरीही आमचा प्रवासआम्ही चालू ठेला.मी निलेशला सांगितलं की आपण एक ब्रेक घेऊ . चांगली जागा बघून आम्ही .०० वाजता ब्रेक घेतला. मी आणि दिपक ने आणलेल्या डब्यातली चपाती  भाजी  खाल्ली तोपर्यंत निलेश आणि सिधूने विश्रांती घेतली.आम्ही आमचे खाऊन झाल्या नंतर थोडी विश्रांती घेतली. .३० वाजता आम्ही पुन्हा सुरवात केली. थोडे चालून गेलेल्या नंतर माझा स्पीड अजून कमी झाला.दिवस उजडायला सुरवात झाली होती.



पूर्वेला आकाशात सुर्य-नारायणा ची लाली पसरली होती.सूर्य डोकवायला लागला होता. टेकड्या वरचे गवत वाळले होते. पण त्याच्या वर पडलेल्या सूर्य किरणांमुळे ते सोनेरी दिसत होते.नजारा खूपच सुंदर होता. शेवटची टेकडी चढायला आम्हाला .३० वाजले होते. ती टेकडी चढून आम्ही थोडी विश्रांती घेतली. थोडी म्हणजे आम्ही अर्धा तास बसलो. .०० वाजत आम्ही राहिलेलं थोडे अंतर उतरू लागलो . आम्ही बरोबर नवीन बोगद्याच्या वर होते.  खाली उतरत असताना  बंगलोर मुंबई हायवे चमकताना दिसत होता. सकाळी सकाळी वाहनांची गर्दी कमी होती.  आजपर्यंत आम्ही हा रस्ता रात्रीचाच पाहीला होता. .३० वाजता आम्ही श्री वाघजाई माता मंदिरात पोहोचलो.देवीचे दर्शन घेतले आणि सरतेशेवटी आमचा S2K  पूर्ण झाला. ट्रेक पूर्ण झाल्या नंतर खूप आनंद झाला. दुखणारे पाय पण विसरून गेलो.  आमचा जाऊन येऊन टोटल ट्रेक २४ किलोमीटर झाला आणि मग आम्ही आमच्या घरच्या परतीच्या प्रवासाला लागलो.

 




                 🙏🏻धन्यवाद🙏🏻

 

     ।। जय जिजाऊ जय शिवराय ।।