Saturday, March 28, 2026

🕉️ केदारनाथ यात्रा – एक दिव्य, थरारक आणि अविस्मरणीय अनुभव

🕉️ केदारनाथ यात्रा – एक दिव्य, थरारक आणि अविस्मरणीय अनुभव
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात झालेली एक साधी भेट…
आणि तिथून सुरू झाला आयुष्यभर लक्षात राहणारा प्रवास.
विनीत आणि त्याचे मित्र केदारनाथ ला जाणार होते. त्याने मला विचारलं… आणि मनात आधीपासून असलेली इच्छा जागी झाली —
“हो, मी येतो!”
✈️ प्रवासाची सुरुवात
26 जून 2023…
पुणे ते दिल्ली विमानप्रवास, आणि पुढे कारने डोंगरांच्या दिशेने.
मी (रामदास), विनीत, महेश, प्रशांत आणि सतीश — आमची टीम तयार होती.
रात्रभर गाडी चालवत, सकाळी फ्रेश होऊन आम्ही पुढे निघालो.
वळणावळणाचे रस्ते, खोल दऱ्या आणि उंच डोंगर…
निसर्ग हळूहळू आपल्याला आपल्या कुशीत घेत होता.
संध्याकाळी आम्ही गौरीकुंड येथे पोहोचलो.
त्या दिवशी वर जाण्यास परवानगी नव्हती, त्यामुळे तिथेच मुक्काम केला.
🚶‍♂️ श्रद्धेचा 16 किमी प्रवास
दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता आम्ही ट्रेक सुरू केला.
थंडी, पाऊस, अंधार… आणि नदीचा खळखळाट — वातावरण रोमांचक होतं.
2013 च्या उत्तराखंड पूर 2013 नंतर सगळं बदललं होतं.
रामबाडा — जो एकेकाळी गजबजलेला टप्पा होता, तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता.
त्या जागेतून जाताना मनात एक वेगळीच भावना होती…
निसर्गाची ताकद आणि आपली मर्यादा दोन्ही जाणवत होते.
चढ कठीण होता. दम लागत होता.
कोणी खेचरावर, कोणी डोलीत… आणि आम्ही स्वतःच्या पायांवर.
ही फक्त ट्रेकिंग नव्हती…
ही एक श्रद्धेची परीक्षा होती.
🛕 केदारनाथ – जिथे शब्द अपुरे पडतात
7-8 तासांच्या प्रवासानंतर मी केदारनाथ मंदिर जवळ पोहोचलो…
आणि त्या क्षणी सगळा थकवा नाहीसा झाला.
चारही बाजूंनी बर्फाच्छादित पर्वत…
मधोमध भव्य मंदिर…
धुक्याची चादर… आणि “हर हर महादेव” चा जयघोष…
तो क्षण शब्दात मावणारा नव्हता.
मंदिराच्या मागे उभं असलेलं भीम शिला पाहताना अंगावर शहारे आले.
श्रद्धा आणि निसर्गाची शक्ती एकाच ठिकाणी जाणवली.
🌧️ भैरवनाथ – पावसातलं रोमांचक दर्शन
दर्शनानंतर आम्ही भैरवनाथ मंदिर कडे निघालो…
आणि अचानक पाऊस सुरू झाला.
हलका पाऊस… आणि मग जोरदार सरी.
ओला, घसरडा रस्ता… थंड वारा…
पण आम्ही थांबलो नाही.
पावसात भिजत, डोंगर चढत…
खाली धुक्यात हरवलेलं केदारनाथ मंदिर दिसत होतं…
त्या क्षणी वाटलं —
आपण निसर्गासमोर किती लहान आहोत.
भिजत घेतलेलं भैरवनाथाचं दर्शन —
एक वेगळंच समाधान देऊन गेलं.
⛺ आश्रम, भजन आणि तंबूतील रात्र
रात्री आम्ही आश्रमात परतलो.
भजन चालू होतं — शांत, भक्तिमय वातावरण.
जेवणानंतर आम्ही तंबूमध्ये गेलो.
बाहेर थंडी, वारा आणि पाऊस…
तंबूमध्ये झोपण्याचा प्रयत्न… पण थंडीमुळे झोप लागत नव्हती.
ती रात्र कठीण होती…
पण तीच सर्वात आठवणीत राहणारी ठरली.
🌄 सकाळ – स्वर्गाचा अनुभव
सकाळी डोळे उघडले… आणि सगळं बदललं होतं.
आकाश निरभ्र…
सूर्यप्रकाशात चमकणारे बर्फाच्छादित डोंगर…
थंड, स्वच्छ हवा…
कालचा सगळा त्रास विसरायला झाला.
खरंच…
तो क्षण म्हणजे स्वर्गाचा अनुभव होता.
आम्ही पुन्हा मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, मित्रांना व्हिडिओ कॉलवर दर्शन घडवलं आणि प्रसाद घेतला.
🔚 परतीचा प्रवास – श्रद्धेचा प्रवाह
दर्शन घेऊन आम्ही परतीला निघालो…
रस्ता अरुंद… गर्दी प्रचंड…
वर जाणारे भाविक —
कोणी चालत, कोणी खेचरावर, कोणी डोलीत…
“हर हर महादेव” चा जयघोष करत पुढे जात होते.
आम्ही उतरत होतो… आणि त्या सगळ्या गर्दीतून वाट काढत पुढे सरकत होतो.
कधी बाजूला व्हावं लागत होतं, कधी थांबावं लागत होतं…
डोलीवाल्यांचे आवाज — “साइड… साइड…”
आणि आम्ही स्वतःला सांभाळत पुढे जात होतो.
तो एक वेगळाच अनुभव होता —
श्रद्धेचा, संयमाचा आणि सहनशक्तीचा.
मी आणि सतीश 4 तासांत खाली गौरीकुंड ला पोहोचलो.
गरम पाण्यात पाय शेकताना…
जाणवलं — सगळा थकवा नाहीसा झाला आहे.
🙏 शेवटचं एक वाक्य…
केदारनाथ यात्रा ही फक्त ट्रिप नाही…
ती स्वतःशी, निसर्गाशी आणि श्रद्धेशी झालेली एक भेट आहे.

Wednesday, January 11, 2023

🚩शेवाळवाडी (पुणे ) ते पंढरपूर सायकल वारी 🚲🚲🚩🚩

                                                                   | पायंडल मारती |
                                                                   ||  पांढरीची वाट ||


पंढरपूर सायकल वारी करायचे हे माझे आणि गुणवंत चे दोन वर्ष्या पूर्वी ठरले होते. पण माझ्याकडे सायकल नव्हती म्हणून  मी निलेश ची सायकल घेऊन आलो. सायकल चालवण्याचा सराव सुरु केला. आम्ही  रविवारी 40 ते 50 किमी सायकल चालवायला सुरुवात केली. एका रविवारी शेवाळवाडी-चौफुला - मोरगाव - जेजुरी - सासवड -शेवाळवाडी अशी 154 किलोमीटर ची राईड केली. त्याच बरोबर आम्ही रनिंग चा पण सराव करत होतो. आम्ही मांजरी स्टड फार्म ते फुरसुंगी 5किलोमीटर जात होतो जाऊन येऊन रोज आम्ही 10 किलोमीटर माझे आणि गुणवंत चे 15किलोमीटर होत होते. आम्ही रनिंग करत असताना मांढरे साहेबांची आणि डॉक्टर भोसले साहेबांची ओळख झाली. आम्ही एकत्र रनिंग करू लागलो. आम्ही बऱ्याच मॅरेथॉन एकत्र पळालो. देशातील सर्वात कठीण अल्ट्रा मॅरेथॉन SRT 2022 (सिंहगड राजगड तोरण ) नाव नोंदणी केली आणि प्रवेश घेतला आणि पूर्ण केल्या.
हे करत असताना आमचे पंढरपूर सायकल वारी चे स्वप्न आम्ही डॉक्टर साहेब आणि मांढरे साहेबांना सांगितले आणि ते पण तयार झाले. 11 डिसेंबर ला SRT ची मॅरेथॉन पूर्ण करून थोडे दिवस सायकलिंग चा सराव करायचा आणि नवीन वर्ष्याच्या दुसऱ्या रविवारी म्हणजे 8 जानेवारी 2023 या दिवशी जायचं ठरले आणि त्या प्रमाणे सर्व तयारी केली. आणि 8 तारखेला आम्ही पंढरपूर वारी चे पाहिलेलं स्वप्न पूर्ण केले. याचं वर्णन श्री सुनिल मांढरे साहेबांनी खुप सुंदररित्या त्यांच्या शब्दा मध्ये केले आहे ते खालील प्रमाणे क्रमशः....

        मी श्री सुनिल मांढरे, माजी सैनिक व कर सहायक, वस्तू व सेवा कर कार्यालय पुणे.   दिनांक ०८/०१/२०२३ हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस! अविस्मरणीय यासाठी की 2017 साली भारतीय सैन्य दलात 27 वर्षे व 3 महिने सेवा करून स्वेच्छानिवृत्ती घेऊन 11  ऑगष्ट 2017 ला GST विभागात बांद्रा कार्यालयात कर सहायक म्हणून नियुक्त झालो.  एक वर्षातच 2018 ला  बदली पुणे कार्यालयात झाली.  पण दुर्दैवाने पुण्यात येण्याच्या एक महिना अगोदर ट्रेन मध्ये प्रवास करताना उजव्या पायाच्या ligament ला injury झाली आणि पुढील 4 ते 5 महिने बैसाकीचा (कुबड्या) सहारा घेऊन चालावे लागले अक्षरश कधी कधी असे वाटत होते परत आपण नॉर्मल पणे चालू शकू किंवा ड्राईव्ह करू शकणार का.  पण आयुर्वेदिक उपचार व इच्छाशक्ती च्या जोरावर त्यावर मात केली व हळू हळू चालायला लागलो.  एक वर्ष झाले मी राहत असलेल्या ठिकाणी मॉर्निंग वॉक ला जात होतो त्यावेळेस दोन मित्र श्रीयुत गुणवंत गायकवाड, प्राथमिकचे शिक्षक व रामदास लावंड, नामवंत आर्किटेक्ट यांची गाठ भेट झाली.  त्यांनी मला धावण्यासाठी प्रोत्साहित केले पण ligament injury मुळे थोडे दिवस हलके हलकेच धावत होतो पण काही त्रास जाणवला नाही आणि मग 1,2,5,10 असे करत 21 किमी पर्यंत मजल मारली आणि मागील वर्षात SRT सह 21 km च्या 5 half मॅरेथॉन धावलो आणि त्याही 2 तास 20 मिनिट मध्ये.  त्याचबरोबर मधी आधी सायकलिंग व ट्रेकिंग चालू होते.  मधल्या काळात डॉ. दत्तात्रय भोसले आमच्या ग्रुप मध्ये जॉईन झाले.  आणि शारीरिक तंदुरुस्ती बाबत माननीय राज्यकर उपायुक्त डॉ. राजेंद्र कुऱ्हाडे साहेब, राज्यकर अधिकारी अप्पासाहेब रोंगे व राज्यकर निरीक्षक प्रदीप गांगरडे सर यांचे मार्गदर्शन व सल्ला नेहमीच पाठीशी होता. गेल्या वर्षांपासून मनात असलेली इच्छा ती म्हणजे पंढरपूर वारी सायकल ने करायची, मनाने माझ्याही नकळत घेतलेले आव्हान शेवटी त्या दिवशी पूर्ण झाले तो दिवस ८ जानेवारी २०२३. 
          मांजरी, हडपसर ते पंढरपूर तब्बल २०४ कि.मी. ची सायकल राईड माझे  ग्रुपच्या वरील तीन मित्रांसोबत सहजपणे अतिशय खेळीमेळीच्या व आनंददायी वातावरणात पूर्ण केली.
      १५ दिवसांपूर्वी आम्ही जाण्याची तारीख निश्चित केली आणि पण डिसेंबरचा शेवटी चा आठवडा सुट्ट्या मध्ये गेला मग फक्त एकच आठवडा शिल्लक राहिला. त्यामध्ये 3-4 राईड मस्तानी तलावाच्या व पाटस टोल नाका बॅक अश्या केल्या. आमच्या सोबतीला गुणवंत गुरुजी होते ज्यांच्या कडे पंढरपूर व तुळजापूर राईड चा मोठा अनुभव होता.  तसेच आमच्या टीम चे नेतृत्व श्रीयुत रामदास लावंड सर करत होते.  त्यांनी राईड साठी लागणाऱ्या साहित्याची, सुरक्षितेची व सर्व तांत्रिक बाबींची माहिती अगोदरच दिली त्याप्रमाणे ७ तारखेला आवश्यक सहित्याची जमवाजमव झाली.
ठरल्याप्रमाणे ८ तारखेला सकाळी  2 वाजता उठलो, पण आदल्या रात्री प्रवासाच्या उत्साहाने 11.30 - 12 वाजेपर्यंत झोप लागली नाही.  आणि अगदी तुटपुंजी 2 ते 2.30 तासांची झोप झाली. स्नान व सर्व प्राथमिक विधी उरकून, चहा घेऊन  3 वाजता गणरायाचे नामस्मरण करून घराबाहेर पडलो व ठरल्या ठिकाणी पोचलो पण सर्व मंडळी गोळा होता 3.30 वाजले. 2-4 फोटो घेऊन व गणपती बाप्पा तसेच शिवरायांचे नाव घेऊन प्रवासाला सुरुवात केली.  

सर्वात पुढे आघाडीला अनुभवी गुणवंत गुरुजी होते, त्यांच्या पाठी मी नवशीख्या , 3 नंबरला डॉक्टर भोसले ज्यांच्याकडे बिना गियर ची सायकल व सर्वात मागे आमचे टीम कॅप्टन रामदास सर ज्यांनी राईड साठी अति आवश्यक असे टूल किट, पंचर साहित्य व हवेसाठी पंप बरोबर ठेवला होता.  असा सोलापूर हायवेने आमचा प्रवास अगदी उत्साहाने सुरू झाला.
गुरुजींना लॉंग राईड चा अनुभव होता त्यामुळे मी त्यांना सोडायचे नाही असे ठरवले होते त्यांनी अगोदरच सर्वाना सांगितले उन्हाच्या अगोदर बरेच अंतर कापायचे पण पाटस नाका येता येता सकाळचे 5.30 वाजले होते आणि आता गुरुजीदेखील नजरेआड झाले होते. पण मनाने कच खाली नाही व पेडल मारत राहिलो आता जवळ जवळ 80 किमी अंतर कापले होते.  मी टीम कॅप्टन ला फोन केला तर ते बोलले आपण भिगवनला ब्रेक घेऊ.  ठरल्याप्रमाणे गुणवंत गुरुजी सर्विस रोड ने खाली थांबले पण मला कळलेच नाही मी पुलावरून पुढे गेला पण 3-4 किमी जाऊन देखील गुरुजी दिसत नव्हते.  मग मात्र आहे तिथेच थांबलो व पुन्हा एक दुसऱ्याला फोन करून सर्वजण एकत्र झालो.  पुढे 2-3 किमी वर श्री व्हेज मध्ये नाष्ट्यासाठी थांबलो. गरम गरम उतापाबरोबर डॉक्टरनी आणलेल्या गूळ व शेंगदाणे पोळीचा आनंद घेतला व 9.30 वाजता पुढील प्रवास चालू केला पण दरम्यान कॅप्टनची सायकल खराब झाली पण कशे बशे तरी 11.30 वाजेपर्यंत इंदापूर गाठले व सायकल दुरुस्त करून घेतली व पुढचा प्रवास सुरु झाला.  8-10 किमी पूढे गेले असता माझी सायकल पंक्चर झाली.  गुरुजी 2 किमी पुढे होते त्याना परत माघारी बोलवले कारण तेच आमचे टेकनिशीयन होते.  500 मि अंतरावर पेट्रोल पंप पाहून सायकल चा पंक्चर काढला व तिकडेच बसून बरोबर घेतलेला सुका मेवा काज, बदाम, किसमिस, खजुराचे लाडू, चिक्की व शेंगदाणे याची न्याहारी केली तिकडे आमचा 1 तास गेला. 
लगेच आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.  आता मात्र गुरुजी व डॉक्टर पुढे निघून गेले व मी आणि कॅप्टन पाठी राहिलो.  ठरल्याप्रमाने टेम्बुरणीवरून राईट टर्न घेयचा होता पण मी अगोदरच वळलो त्यावर टीम कॅप्टन थोडे नाराज झाले पण चूक लवकरच सुधारली आणि एकदाचा पंढरपूर EXIT चा रोड आला.  टीम कॅप्टन खूप थकले होते मग आम्ही राहिलेला सुका मेवा व उसाचा रस घेतला व मार्गस्थ झालो.  2 किमी गेलो तर परत एकदा माझी सायकल पंक्चर झाली आता मात्र तळपणारा सूर्य देवता व थकलेले शरीर यामुळे परत पंक्चर काढण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्पेयर ट्यूब बदलणे सोयीस्कर समजून ट्यूब पटकन बदलली.  पण आता मात्र माझे मनोबल खचले की सायकल परत पंचर झाली तर काय करणार कारण होती ती ट्यूब देखील use केली होती.  मग सायकल टेम्पोत टाकून जायचे ठरविले आणि तसेच झाले असे वाटले म्हणून उतरून पाहिले तर हवा होती.  मग मात्र जीवाच्या आकांताने पेडलिंग चालू केले आणि शेवटचा 40 किमी चा टप्पा एक दमात पार करून ठीक 5 वाजता पंढरपूर गाठले.  डॉक्टर व टीम कॅप्टन 10-15 मिनिटात आम्हाला जॉईन झाले.  सर्वात प्रथम पांडुरंगाचे दर्शन घेतले व चंद्रभागेच्या तीरावर गेलो आणि 204 किमी सायकल प्रवास करून पंढरपूर वारी सार्थ झाली.

मन एकदम प्रसन्न व प्रफुल्लीत झाले.दिवसभराची दमणूक, कंटाळा अन् शीन कधीच निघून गेला.   व संध्याकाळी 7 वाजता सायकल्स टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये  ठेवून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. रात्री 1 वाजता सर्वजन आपापल्या घरी पोहोचलो. ते देखील पुढच्या अंबाबाई दर्शनाच्या म्हणजेच कोल्हापूर राईडचा संकल्प करुनच.

  धन्यवाद!!!
     श्री. सुनिल मांढरे, कर सहायक 🚲🚲

Thursday, August 27, 2020

अष्टविनायक बुलेट राईड (ब्लिट्झक्रिक रायडींग क्लब पुणे #BRCPUNE )

अष्टविनायक बुलेट राईड(ब्लिट्झक्रिक रायडींग क्लब पुणे #BRCPUNE )

प्लॅनिंग एकमहिना अगोदरच चालू केले होते. नेहमी प्रमाणे १०-१५ जणांची लिस्ट झाली  होती. फेबुरवारी २०२० तारीख फायनल झाली होती, शेवटच्या दिवशी आठच जन आले. काय योगा योग्य ८अष्टविनायक राईड आठ रायडर्स आणि आठ तारीख. सकाळी .३० वाजता प्लॅटूनीम ऑटो फातिमानगर ला आम्ही भेटलो. मी रामदास, मधुर, धीरज, शंकर, अभिजीत, प्रशांत, सचिन आणि वरून असे आम्ही आठ जण आलो. राईडच मार्ग तर अगोदरच ठरला होता. शास्त्रोक्त पद्धतीने दर्शन घ्याचे ठरवले होते.

) मोरगावचा- मोरेश्वर

) सिद्धटेकचा- सिद्धिविनायक

) पालीचा- बल्लाळेश्वर

) महडचा - वरदविनायक

) थेऊरचा - चिंतामणी

) लेण्याद्रीचा-  गिरिजात्मज

) ओझरचा- विघ्नहर

) रांजणगावचा- महागणपती

अश्या सिक्वेन्स ने दर्शन घ्याचे असे ठरले. त्या नुसार.ठीक वाजता राईड चालू झाली . पहिला गणपती मोरगाव सकाळी सकाळी रोड मोकळे होते. हडपसर मार्गे जेजुरी मोरगाव ६० किलोमिटच अंतर आम्ही .१५ मिनटात पूर्ण केले. रोड चांगला आणि मोकळा होता. त्यामुळे आम्ही .१५ ला मोरगाव ला पोहचलो



आम्हाला सकाळची गणपतीची आरती मिळाली. गर्दी जास्त नव्हती दर्शन  लवकर झाले.  बाहेर चहा घेऊन आम्ही दुसऱ्या गणपतीच्या दिशेनं निघालो मार्ग होता केडगाव चौफुला- पाटस-दौंड आणि सिद्धटेक. मोरगाव ते चौफुला रोडचे काम चालू होते. रोडला खडे होते, त्यामुळे स्पीड कमी होता. चौफुला रोड खराबच होता. चौफुला पाटस रोड चांगला होता तो १० मिनटात संपला पाटस पासून पुढे सिद्धटेक पर्यंत सगळं रोड खराब मोठमोठे खडे. सिद्धटेक ला पोहचायला आम्हाला दोन तास लागले. तिथे थोडी गर्दी होती अर्ध्या तास मध्ये आमचे दर्शन झाले. बाहेत टपरी वर नास्ता केला. आणि पालीच्या दिशेने निघालो हे अंतर जवळ पास २३० किलोमीटर आहे. ११ वाजता आम्ही सिद्धटेक वरून निघालो असेल. रोड खुपसच खराब होता रोडचे काम चालू होते. शिक्रापूरला पोचायला आम्हाला .०० वाजला होता. हायवे ला खूप ट्राफिक होते. आहि दुपारी चाकण तळेगाव MIDC मध्ये जेवण करण्यासाठी  थांबलो दोन वाजले होते. तीन वाजता निघाचे ठरले त्यानुसार बरोबर तीन वाजता आम्ही तिथून निघालो. अजून १२५ किलोमीटर अंतर राहिले होते खोपोली पर्यंत रोड चांगला  होता. तिथून पुढचा रोड खूपच खराब होता. ३० किलोमीटर जाईल आम्हाला एक तास लागला पाली मध्ये  आम्ही संध्यकाळी  .४५ पोहचलो दर्शन घेऊन आम्ही .१५ ला लगेच निघालो. महाड चे अंतर ३०-३५ किलोमीटर आहे पण रोड सगळा खराब. महाड ला पोचाय ला आम्हाला .१५ वाजेल. गाड्या पार्क करून मंदिर मध्ये गेलो. .३० वाजले होते. आरतीची वेळ झाली होती. आम्ही आरती घेऊनच जायचे ठरवले. आम्ही आरती घेतली आणि . आणि आजच्या दिवसातल्या चौथा गणपतीचे सांगता पण आरतीनेच झाली. प्रसाद घेऊन बाहेर आलो आणि आजचा मुकाम कुठे करायचा  याच्यावर कॉफी पीत चर्चा केली आणि पुण्यात जाऊन मुकाम करायचा ठरवले दुसऱ्या दिवसाचे रनिंग पण खूप होते आज जितके जास्त रनिंग करू तितके  चांगले होते. आम्ही आठ वाजता महाडसोडले आणि लोणवल्या नंतर दाभ्यावर रात्रीचे जेवण करायचे ठरवले. .३० वाजता आम्ही जेवण करायला थांबलो. जेवण येपर्यंत रूमची शोधा शोध केले आणि थेऊरच्या जितके जवळ रूम मिळेल तितका प्रयत्न केले आणि लोणीच्या जवळ रूम बुक केले. जेवण उरकून आम्ही १०.४० ला निघालो. रूम वर पोहचायला आम्हाला १२ वाजले होते. चेक इन करून आम्ही आह्मी फ्रेश झालो आणि सकाळी वाजता निहायचे ठरून झोपी गेलो. रूम पासून थेऊर १० किलिमीटरच होते. आम्हाला पोहचायला वेळ लागणार नव्हता .

आम्ही सकाळी वाजता उठून .३० ला आजच्या दिवसाची सुरवात केले आजचा गणपती पाचवा होता. आठ वाजता  मंदिरात पोहचलो. दर्शनाला थोडी लाईन होती. दर्शन घेतले आणि बाहेरच नास्ता केला. यांच्या ननंतरच गणपती होता लेण्याद्री. थेऊर लोणीकंद या रोडने आम्ही नगर रोडला पोहचलो आणि कोरेगाव मधून  वाढू मार्गे चाकणला जायचे ठरवले. वाढू म्हणजे  संभाजी महाराजांचे समाधी स्थान. आम्ही दर्शन घ्याचे ठरवले. आम्हाला जास्त वेळे लागला नाही. दर्शन घेऊन आम्ही लगेच निघालो. चाकण मार्गे  नारायण गाव लेण्याद्री ला आम्ही .३० वाजता पोहोचलो लेण्याद्री चा गणपतीला जाईल ३५१ पायऱ्या चालून जावे लागते. हा गणपती डोंगरावर घुहे मध्ये आहे या घुले तिसऱ्या  शतकात बनवलेले आहेत. बौद्धकालीन गुहा आहेत. दर्शन घेऊन आम्ही जेवण करून ओझरच्या गणपतीला गेलो. ओझरला आम्ही .३० वाजता पोहोचलो. दर्शन साठी गर्दी नव्हती आमचे दर्शन लगेच झाले. सात गणपतींचे दर्शन झाले होते होते आता आठ महानगणपती राहिला होता अंतर राहिले होते ७५ किलोमीटर पोहोचायला - .३० तास लागणार असे गुगल मॅपने सांगितले. आम्ही वाजता निघालो. रोड खराबच होता. मोठमोठाले खडे . अंगाचा खुळखुळ झाला होता आम्ही वाजत रांजणगावला पोहचलो. रांजणगावलं खूप गर्दी होती.  मोठी रांग  होती. आम्ही पास घेऊन दर्शन घ्याचे ठरवले आणि दर्शन घेतले. अशा पद्धतीने आमचे अष्टविनायक चे दर्शन खूप चांगल्या पद्धतीने झाले. आमचे टोटल रनिंग ८२५ किलोमीटर झाले.


Thursday, May 21, 2020

!! लिंगाणा एक आव्हान !! ३ जानेवारी २०१८.


 "लिंगाणा"

"लिंगाणा" सह्याद्रीमधील एक अतिशय अवघड किल्ला. मागे सांगितल्या प्रमाणे निलेश मला फोन करतो, पार्टनर आपल्याला लिंगाणा करायचा आहे. खूप अवघड किल्ला आहे तूला थोडी शाररिक स्ट्रेंथ वाढवावी लागले. थोडा व्यायाम कर. आम्ही या लिंगाण्याचे गिर्यारोहण भगवान चवले यांच्या सोबत बरोबर करणार होतो. यंदा भगवान दादांची एव्हरेस्ट मोहीम असल्याने त्यांने शुल्क कमी ठेवले होते. तारीख होती जानेवारी २०१८.

 

          लिंगाण्या साठी मी, निलेश, काजल (भाची) आणि तेजस असे आम्ही चौघांनी आमची नावे देऊन आमची जागा फिक्स केली. चाळीस जणांचा ग्रुप होता.

जानेवारी ला रात्री ११.०० वाजता पिकअप पॉईंट वरून बस निघणार होती. रात्रीचा मुक्काम "मोहरी" गावात करायचा होता. त्यानुसार मी माझी तयारी सुरू केली. धावण्याच्या सराव तर आधी पासून करतच होतो. थोडासा हाताचा रग वाढवण्यासाठी सोसायटीच्या जिममध्ये जायला सुरुवात केली.

          नेमके ज्या रात्री आम्हाला ट्रेकला निघायचे होते त्याचं दिवशी एक महत्त्वाचे काम होते, ते ही मुंबईत. 'मुंबई की ट्रेक' असा पेच पडला. शेवटी दोन्ही गोष्टी करायच्या म्हणून 'सकाळी मुंबई - रात्री ट्रेक' असे नियोजन केले. जवळपास एक महिन्या पासून करीत असलेली तयारी फळास येणार होती.

           शेवटचा पिकअप पॉईंट "नऱ्हे" पुला जवळ होता. काहीकरून मला तिथे १०.४५ ला पोचायचे होते. मे केलेले नियोजन माझ्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांना सांगितले. काही करून आपण १०.३० ला पुण्यात पोचले पाहिजे. मी सकाळी घरातून निघताना ट्रेकिंगची बॅग घेऊनच निघालो.

           माझा प्रॉब्लेम सुटला. आता 'काजलचा' प्रॉब्लेम ती माझ्या बरोबरच येणार होती. तिला अडचण सांगितली आणि 'तेजस' बरोबर यायला सांगितले. तो हडपसर मधूनच येणार होता आणि ती बी टी कवडे रोडवरून...

त्याला फोन करून सांगितले की तू काजल ला घेऊन ये. निलेश डायरेक्ट येणार होता. तसे आम्ही एकमेकांना सांगितले. मी शेवटच्या स्टॉपवर थांबतो असे सांगितले.

          मी तारखेला सकाळी .३० ला  ट्रेकच्या तयारीने घरून निघालो. मुंबईचे काम उरकुन आम्ही सायंकाळी वाजता मुंबई मधून निघालो. बरोबर .३० ला आम्ही वाकड मध्ये पोचलो. हॉटेल मध्ये जेवण करून बरोबर १०.३० वाजता यांनी मला 'नऱ्हे' पुल जवळ सोडले आणि मी माझ्या वेळेमध्ये पोहोचल्याचा आनंद झाला. मला शुभेच्छा देऊन अर्चना आणि शैलेश निघून गेले.

           मी बसची वाट बघत थांबलो 'निलेश' ला फोन करून सांगितले की मी स्टॉप वर पोचलो आहे. काजल आणि तेजस पण बस मध्ये बसले होते. थोड्या वेळात बस आली आणि मी आणि माझ्या बरोबर नऱ्हे गावातील एकजण होता. आम्ही दोघे बस मध्ये बसलो 'भगवान' दादांनी शेवटचा काऊंट घेतला आणि प्रवास चालू झालामी तर झोपून घेतले सकाळी लवकर निघालो होतो. रात्री दीड दोन वाजता आम्ही मोहरी गावात पोचलो. कधी कसे पोचलो मला काय समजलेच नाही.

          आम्ही बसमधून उतरलो बस एका घरा जवळ थांबली होती. भगवान दादांनी सगळ्यांना सकाळी लवकर उठायचे आहे असे सांगितले आणि घराच्या बाजूला मोकळ्या जागेत झोपायला सांगितले. महिलांसाठी घरामध्ये व्यवस्था केली होती. बाहेर खूप थंडी होती. सपाट जागाबघून अंथरून टाकुन आम्ही झोपलो. आकाशनिरभ्र होते. चांदण्या चम चम चमकत होत्या. खुप वर्षानंतर असा अंगणात झोपत होतो. तारे मोजता मोजता कधी झोप लागली ते समजलेच नाहीपहाटे .३० वाजता सगळ्यांना उठवण्यात आले. ब्रश केले फ्रेश झालो. तो पर्यंत चुलीवर चहाचे आधण ठेवले होते.

          भगवान दादांच्या शिलेदारांनी प्रत्येकास हेल्मेट, हर्णेस आणि बिले असे सेफ्टी किट दिले. अंधारच होता ज्यांचा चहा पिऊन झाला आहे त्यांना पुढे जायला सांगितले. आम्ही पण सुरुवात केली पंधरा वीस मिनिटात आम्ही बोराट्याच्या नाळे जवळ पोचलो अंधार होता बॅटरीच्या उजेडात आम्ही ती नाळ उतरत होतो

नाळ उतरेपर्यंत उजेड पडायला सुरुवात झाली होती. ती नाळ सरळ खाली जात होती. अर्ध्यावर गेल्या नंतर उजव्या बाजूने रायलिंग पठाराच्या कपारी कपारीने आम्ही चालत होतो. डाव्या बाजूला खोल दरी होती. समोर उंचच्या उंच लिंगाणा दिसत होता. सूर्याच्या कोवळ्या किरणांच्या प्रकाशाने 'लिंगाणा' सोनेरी दिसत होता.

          वाजता आम्ही लिंगाणा माचीवर पोचलो होतो. भगवान दादांच्या शिलेदारांनी पुढे जाऊन रोप बांधुन ठेवलेला होता. हा किल्ला कुठल्याही सुरक्षा-साधनां शिवाय चढणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे. कारण जी वाट वरती जाते ती खूप निमुळती आहे. दोन्ही बाजूला खोल दरी आणि जंगल आहे. वाट पण घसरडी आहे. हे सगळं समोर दिसत होते. जे अगोदर पोचले होते त्यांनी चढाईला सुरुवात केले होती. भगवान दादांनी सगळ्यांचे बिले, हर्णेस तपासून घेतले आणि पुढे पाठवले



आम्ही सगळ्यात शेवटी होतो. पुढे सगळ्यांची रांग लागलेली होती. आम्ही .३० वाजता चढाईला सुरुवात केली दोन्ही बाजूला खुप खोल दरी होती. दादांनी सगळ्यांना ताकीद देऊन ठेवली होती की काही झाले तरी रोप मधून बिले काढायचे नाही. आम्ही हळू हळू पुढे सरकत होतो. काही ठिकाणी उंच कडे होते त्यामुळे त्याठिकाणी वरती चढायला उशिर लागत होता. थोडे वरती गेल्या नंतर जोरात हवा सुरू झाली होती. तोल जात होता. खाली पाहिले तर खोल दरी दिसत होती. कडा चढताना चांगलाच कसं लागत होता. माझ्या हाताची ताकत कमी पडत होती.

 

          आम्ही मध्यावर पोचलो होतो. उजव्या बाजूला एक गुहा आणि डाव्या बाजूला पाण्याचे टाके आहे. आम्ही ती गुहा जाऊन पाहिली. त्या गुहे मध्ये कैदी ठेवत असत. आम्ही काही फोटो काढले. समोर रायलिंग पठार दिसत होते. पुढे चढाईला सुरुवात केली. आम्ही चौघे एका मागे एक असेच चालत होतो. जस-जसे वर जात होतो तस-तशी दरी खूप खोल होत होती

आमच्या समोर जे वरती चढत होते त्यांची अवस्था आम्ही बघत होतोप्रत्येक जन जपूनच पाऊल टाकत होताएकमेकांना प्रोत्साहन देत आमचे गिर्यारोहण चालू होतेमला तर प्रोत्साहनाची खूप गरज भासत असे आणि  काम निलेश करत होता.

आम्हाला लिंगाण्याच्या माथ्यावर पोचायला १२ वाजले असतील . सगळ्यात शेवटी आम्ही पोहोचलो होतो. समोर एक काका शीर्षासन करून लिंगाण्याला वंदन करत होते.लिंगाणा चढणे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्नं असते. ते आम्ही पूर्ण केले होते. माथ्यावर पोचल्यावर सगळं थकवा निघुन गेला. आनंद गगनात मावेनासा झालामाथ्यावर पोचल्यावर सकाळपासून अंगात असलेले हर्णेस, हेल्मेट काढून ठेवले. आजूबाजूला नजर फिरवली तर तोरणा, राजगड, रायगड किल्ले दिसत होते. या माथ्यावरुन संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवता येत होत. म्हणून या किल्ल्याला स्वराज्यात अनन्य साधारण महत्त्व होते. काजलने आणि निलेश ने जे काही बरोबर आणले होते ते आम्ही पटा-पट खाऊन घेतले. थोडा आराम पण केला

भगवान दादांना सांगून आम्ही परतीचा प्रवास चालू केला. बाकीचे अजून बसलेलेच होते. काहींचा फोटो सेशन चालू होते. आम्ही सगळ्यात शेवटी पोचलो आणि सगळ्यात पहिल्यांदा निघालो. 

          मी, काजल, निलेश आणि तेजस निघालो. पहिला टप्पा आम्ही रॅपलिंग करून उतरलो. रॅपलिंग करताना हाताची ताकत कमी पडत होती. म्हणून आम्ही रॅपलिंग करता दोरीच्या मदतीने उतरलो. आमच्या तिघांचा उतरण्याचा वेग जास्त होता. तेजस आमच्या पासून मागे राहिला होता. आमच्या जवळ चे पाणी संपले होतेमध्यावर आल्या वर डाव्या बाजूला जे पाण्याचे टाके आहे त्याच्यातून पाणी पिले. पाणी खुप थंड आणि चविष्ट होते. बिस्लरीच्या पाण्याला या पाण्याची सर नाही. पोटभर पाणी पिले आणि भरून पण घेतले आणि निघालो. उतरतताना मला जास्त त्रास होत नव्हता. त्यामुळे आमचा उतरण्याचा वेग पण जास्त होता. गर्दी काहीच नव्हती सगळे अजून मागेच होते. दीड पावणेदोन तासात आम्ही उतरलो होतो. हर्णेस, हेल्मेट काढून बॅगेत ठेवले. थोडावेळ थांबलो, बाकीच्यांनी आत्ता कुठे उतरायला सुरुवात केली होती. तेजस खूप लांब राहिला होता. तो फोटो काढत निवांत उतरत होता. आम्ही चालायला सुरुवात केली रायलिंग पठाराच्या कड्याच्या बाजूनी आम्ही चालत होतो. उजव्या बाजूला खोल दरी होती.


  थोड्याच वेळात आम्ही बोरट्याच्या नाळे जवळ पोचलो. जी पहाटे अंधारात आम्ही उतरलो होतो. आता तिचे रौद्ररूप दिसत होते. मोठ-मोठाले दगड त्या नाळे मध्ये होते. पावसाळ्यात पठारवरचे आणि डोंगरावरचे पाणी या नाळे मधुन खोल दरीत जात होते. आम्ही ती नाळ चढत होतो. नाळ चढून गेल्यावर, थोडे चालल्यावर आम्हाला आमची बस दिसली. आम्ही सायंकाळी :४५ ला बस जवळ पोचलो.

           आमचे गिर्यारोहण पूर्ण झाल्याचे खुप आनंदी झालो होतो.


!! जय शिवराय!!

  !!धन्यवाद!!