कात्रज ते सिंहगड(K2S) ट्रेक ०७/१२/२०१९....
हा ट्रेक म्हणजे सर्व ट्रेकर्स चा आवडता ट्रेक. मी आणि निलेश सिंहगड-राजगड-तोरणा-रायगड(SRTR)हा ट्रेक करणार आहोत. त्याची प्रॅक्टिस म्हणून आजचा हा कात्रज सिंहगड(K2S)ट्रेक. मी या ट्रेकच्या अगोदर सात वेळा आणि निलेशने आठ वेळा ट्रेक केला आहे, एक वेळेस दिवसा केलेला.विद्या माझी बहीण आणि निलेश ची बायको आहे. तिने हा ट्रेक तीन वेळेस केला आहे. शौर्य निलेश चा मुलगा 10 वर्षाचाच आहे त्याने दोन वेळेस केला आहे. प्रत्येक वेळेस रुक्मिणी (बायको) चपाती , शेंगदाण्याची चटणी, खारे शेंगदाणे आणि गोड डीश म्हणून रव्याचे लाडू हा ठरलेले मेनू. मी तीला सांगितले की मला ट्रेक ला जायचे आहे, की हा ठरलेला मेनू तयार ठेवते. प्रत्येक वेळेस कमीत कमी १५-२० ट्रेकर्स असायचे. पण या वेळेस मी आणि निलेश दोघेच होतो. निलेशच्या मैत्रिणीचा एक १० जणांचा ग्रुप होता.
कात्रज बोगद्या जवळ आम्ही रात्री १० वाजता पोहचलो होतो. तो ग्रुप आमच्या अगोदरच पोहचला होता. ग्रुप लीडर बरोबर त्या मैत्रिणीने ओळख करून दिली आणि ते निघाले. त्यांना आम्ही सांगितले कि तुम्ही वाघजाई माता मंदिरा जवळ थांबा आम्ही येतोच. आम्ही १०-१५ मिनटात पोहचलो पण ते मंदिरा जवळ थांबले नव्हते. आम्ही आमचा नेहमीचा सेल्फी काढला आणि सुरुवात केली. अजून ट्रेक ला सुरुवात नव्हती झाली म्हणून पायवाट काय दिसत नव्हती. गवत खूप वाढलेले होते. आम्ही पुढे गेलो तरी आम्हाला तो ग्रुप कुठे दिसत नव्हता. आम्ही पण थोडी वाट चुकलो पण आमच्या लक्षात लगेच आले आणि आम्ही टेकडीच्या दिशेने जायला सुरुवात केली. मी खूप दिवसा नंतर ट्रेक करत होतो. आम्ही पहिली टेकडी चढून गेलो तरी. तो ग्रुप कुठे दिसत नव्हता. अजून एक टेकडी चढून गेल्यानंतर दोन टॉर्च चे उजेड दिसू लागले. आम्ही आमचा स्पीड वाढवला. आणि एक तास नंतर आम्ही त्यांच्या जवळ पोहोचलो आणि लक्षात आले कि हा तो ग्रुप नाहीच हा दुसराच ग्रुप आहे . निलेशने त्यांच्या मैत्रणीला फोने लावला नेटवर्क नसल्यामुळे फोने लागायला वेळ
येत्या १४ तारखेला एकाच रात्री K2S करुन परत S2K करायचा दृढ निश्चय केला आहे.
।। जय जिजाऊ जय शिवराय ।।
#K2S2K#
(कात्रज ते सिंहगड- सिंहगड ते कात्रज)
#नुसतीच तंगडतोड#
१४/१२/२०१९....
गेल्या
शनिवारीच(०७.१२.१९) आम्ही K2S केला होता पण या वेळी S2K पण करायचाच असा निर्धार केला होता.
मग ठरल्या प्रमाणे आम्ही शनिवारी(१४.१२.१९) रात्री ८.४५ मिनीटांनी श्री वाघजाई माता मंदिर पासून K2S ला सुरवात केली. ट्रेकला मी निलेश सिद्धू आणि दीपक असे चौघे होतो. टार्गेट होते के जितके लवकर आपण कोंढणपूर फाट्यावर पोहचू तितकेच लवकर रिटर्न येऊ शकू. आम्ही नॉनस्टॉप सुरवात केली जोश तर खूप होता की आज आपण K2S2K करणार आहे. पहिली टेकडी चढत असताना माघे ३-४ बॅटऱ्यांचे उजेड दिसू लागले. तसं आम्ही आमचा स्पीड वाढवला. सिद्धूने टेकड्या मोजायला सुरवात केली. त्याचे कॉऊंटिंग चालूच होते. दीपक चा पाय थोडा दुखत होता तरी तो चालत होता.मला सुरवातीला काही त्रास झाला नाही पण शेवटी शेवटी माझापण पाय दुखायला लागला त्यामुळे माझा स्पीड कमी झाला. मागच्या शनिवारीच या रूट वरून गेलो होतो म्हणून आम्ही भरभर चाललो होतो. उंच टेकडी चढून गेलो कि थोडा वेळ थांबायचो. असे करता करता आम्ही राञी १.३० वा. कोंढणपूर फाट्यावर पोहोचलो.आम्ही नॉनस्टॉप ४तास ४५ मिनिटांत फाट्यावर पोहोचलो होतो. मी आणि दिपक पूर्ण थकून गेलो होतो. तिथल्या हॉटेलच्या कट्यावर मी आणि दीपक लगेच झोपलो आणि सिद्धू आणि निलेश ची चर्चा चालू झाली की या दोघांचे काय खरा नाही.आपण दोघे रेटून चालू करू. तरी निलेश ने २.३० अलार्म लावला आणि त्यांनी पण थोडा आराम केला.आम्ही दोघे लगेच झोपी गेलो. २.१५ वाजता निलेश ने आम्हाला उठवायला सुरवात केली. दिपकच्या मनात तर नव्हते रिटर्न जायचे तो माझ्या भरवस्या वर होता. मी नाही म्हंटलं तर त्याचे कॅन्सल होणार होते. पण मी तयार झाल्या नंतर दिपक पण तयार झाला. पहाटे ३.०० वाजता आम्ही तयार झालो आणि आमचा परतीचा प्रवास चालू झाला. आलेल्या वाटेने परत जायचे होते. असे करणारे खूप तुरळक असतात.आता पर्यंत आम्ही ९-१० वेळा K2S ट्रेक केला पण मागच्या ट्रेकला रिटर्न ट्रेक करणारे दोघे आम्हाला भेटले होते आणि त्यांना पाहूनच आम्ही #K2S2K# करण्याचा निश्चय केला होता. ज्या टेकड्या आम्ही चढलो त्या उतरायच्या होत्या आणि ज्या उतरलो होतो त्या चढायच्या होत्या . असा आम्ही पहिल्यांदाच करत होतो.रिटर्न मध्ये सुरवातीच्या टेकड्या उतरायला खूपच उतार असलेल्या आणि घसरडया आहेत. जसजसे आम्ही पुढे जाऊ लागलो तस- तसे K2S करणारे आम्हाला भेटू लागले. आणि विचारू लागले तुम्ही रिटर्न चाललाय काय..अजून किती राहिले आहे. जो तो भेटणार असे प्रश्न विचारात होता. काही त्यांच्यातले त्यांच्यात चर्चा पण करत होते अरे K2S करून S2K करणारे पण आहेत असा कधी विचारपण केला नव्हता. प्रत्येकाला आश्चर्य वाटत होते. आमचे अभिनंदन करून शुभेच्या देत होते. आम्ही येताना कुठे काही खाण्यासाठी थांबलो नव्हतो आणि पोहोचल्यावर कोंढणपूर फाट्यावर पण काहीच खाल्ले नव्हते.४-५ टेकड्या चालून गेल्या नंतर मला भूक लागली.तरीही आमचा प्रवास आम्ही चालू ठेला.मी निलेशला सांगितलं की आपण एक ब्रेक घेऊ . चांगली जागा बघून आम्ही ५.०० वाजता ब्रेक घेतला. मी आणि दिपक ने आणलेल्या डब्यातली चपाती भाजी खाल्ली तोपर्यंत निलेश आणि सिधूने विश्रांती घेतली.आम्ही आमचे खाऊन झाल्या नंतर थोडी विश्रांती घेतली. ५.३० वाजता आम्ही पुन्हा सुरवात केली. थोडे चालून गेलेल्या नंतर माझा स्पीड अजून कमी झाला.दिवस उजडायला सुरवात झाली होती.



पूर्वेला आकाशात सुर्य-नारायणा ची लाली पसरली होती.सूर्य डोकवायला लागला होता. टेकड्या वरचे गवत वाळले होते. पण त्याच्या वर पडलेल्या सूर्य किरणांमुळे ते सोनेरी दिसत होते.नजारा खूपच सुंदर होता. शेवटची टेकडी चढायला आम्हाला ८.३० वाजले होते. ती टेकडी चढून आम्ही थोडी विश्रांती घेतली. थोडी म्हणजे आम्ही अर्धा तास बसलो. ९.०० वाजत आम्ही राहिलेलं थोडे अंतर उतरू लागलो . आम्ही बरोबर नवीन बोगद्याच्या वर होते. खाली उतरत असताना
बंगलोर मुंबई हायवे चमकताना दिसत होता. सकाळी सकाळी वाहनांची गर्दी कमी होती.
आजपर्यंत आम्ही हा रस्ता रात्रीचाच पाहीला होता. ९.३० वाजता आम्ही श्री वाघजाई माता मंदिरात पोहोचलो.देवीचे दर्शन घेतले आणि सरतेशेवटी आमचा S2K
पूर्ण झाला. ट्रेक पूर्ण झाल्या नंतर खूप आनंद झाला. दुखणारे पाय पण विसरून गेलो. आमचा जाऊन येऊन टोटल ट्रेक २४ किलोमीटर झाला आणि मग आम्ही आमच्या घरच्या परतीच्या प्रवासाला लागलो.




🙏🏻धन्यवाद🙏🏻
।। जय जिजाऊ जय शिवराय ।।





Partner after this lockdown b prepared for K2S2K2S👍🏼💪🏼💪🏼💪🏼
ReplyDeleteYes partner one of my friend is ready for trek!!
DeleteYes sir we can do it.
DeleteYou and Ramdas Sir with us then we don't have any problem.
You both are our motivational Leader♥️.