Thursday, May 21, 2020

!! लिंगाणा एक आव्हान !! ३ जानेवारी २०१८.


 "लिंगाणा"

"लिंगाणा" सह्याद्रीमधील एक अतिशय अवघड किल्ला. मागे सांगितल्या प्रमाणे निलेश मला फोन करतो, पार्टनर आपल्याला लिंगाणा करायचा आहे. खूप अवघड किल्ला आहे तूला थोडी शाररिक स्ट्रेंथ वाढवावी लागले. थोडा व्यायाम कर. आम्ही या लिंगाण्याचे गिर्यारोहण भगवान चवले यांच्या सोबत बरोबर करणार होतो. यंदा भगवान दादांची एव्हरेस्ट मोहीम असल्याने त्यांने शुल्क कमी ठेवले होते. तारीख होती जानेवारी २०१८.

 

          लिंगाण्या साठी मी, निलेश, काजल (भाची) आणि तेजस असे आम्ही चौघांनी आमची नावे देऊन आमची जागा फिक्स केली. चाळीस जणांचा ग्रुप होता.

जानेवारी ला रात्री ११.०० वाजता पिकअप पॉईंट वरून बस निघणार होती. रात्रीचा मुक्काम "मोहरी" गावात करायचा होता. त्यानुसार मी माझी तयारी सुरू केली. धावण्याच्या सराव तर आधी पासून करतच होतो. थोडासा हाताचा रग वाढवण्यासाठी सोसायटीच्या जिममध्ये जायला सुरुवात केली.

          नेमके ज्या रात्री आम्हाला ट्रेकला निघायचे होते त्याचं दिवशी एक महत्त्वाचे काम होते, ते ही मुंबईत. 'मुंबई की ट्रेक' असा पेच पडला. शेवटी दोन्ही गोष्टी करायच्या म्हणून 'सकाळी मुंबई - रात्री ट्रेक' असे नियोजन केले. जवळपास एक महिन्या पासून करीत असलेली तयारी फळास येणार होती.

           शेवटचा पिकअप पॉईंट "नऱ्हे" पुला जवळ होता. काहीकरून मला तिथे १०.४५ ला पोचायचे होते. मे केलेले नियोजन माझ्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांना सांगितले. काही करून आपण १०.३० ला पुण्यात पोचले पाहिजे. मी सकाळी घरातून निघताना ट्रेकिंगची बॅग घेऊनच निघालो.

           माझा प्रॉब्लेम सुटला. आता 'काजलचा' प्रॉब्लेम ती माझ्या बरोबरच येणार होती. तिला अडचण सांगितली आणि 'तेजस' बरोबर यायला सांगितले. तो हडपसर मधूनच येणार होता आणि ती बी टी कवडे रोडवरून...

त्याला फोन करून सांगितले की तू काजल ला घेऊन ये. निलेश डायरेक्ट येणार होता. तसे आम्ही एकमेकांना सांगितले. मी शेवटच्या स्टॉपवर थांबतो असे सांगितले.

          मी तारखेला सकाळी .३० ला  ट्रेकच्या तयारीने घरून निघालो. मुंबईचे काम उरकुन आम्ही सायंकाळी वाजता मुंबई मधून निघालो. बरोबर .३० ला आम्ही वाकड मध्ये पोचलो. हॉटेल मध्ये जेवण करून बरोबर १०.३० वाजता यांनी मला 'नऱ्हे' पुल जवळ सोडले आणि मी माझ्या वेळेमध्ये पोहोचल्याचा आनंद झाला. मला शुभेच्छा देऊन अर्चना आणि शैलेश निघून गेले.

           मी बसची वाट बघत थांबलो 'निलेश' ला फोन करून सांगितले की मी स्टॉप वर पोचलो आहे. काजल आणि तेजस पण बस मध्ये बसले होते. थोड्या वेळात बस आली आणि मी आणि माझ्या बरोबर नऱ्हे गावातील एकजण होता. आम्ही दोघे बस मध्ये बसलो 'भगवान' दादांनी शेवटचा काऊंट घेतला आणि प्रवास चालू झालामी तर झोपून घेतले सकाळी लवकर निघालो होतो. रात्री दीड दोन वाजता आम्ही मोहरी गावात पोचलो. कधी कसे पोचलो मला काय समजलेच नाही.

          आम्ही बसमधून उतरलो बस एका घरा जवळ थांबली होती. भगवान दादांनी सगळ्यांना सकाळी लवकर उठायचे आहे असे सांगितले आणि घराच्या बाजूला मोकळ्या जागेत झोपायला सांगितले. महिलांसाठी घरामध्ये व्यवस्था केली होती. बाहेर खूप थंडी होती. सपाट जागाबघून अंथरून टाकुन आम्ही झोपलो. आकाशनिरभ्र होते. चांदण्या चम चम चमकत होत्या. खुप वर्षानंतर असा अंगणात झोपत होतो. तारे मोजता मोजता कधी झोप लागली ते समजलेच नाहीपहाटे .३० वाजता सगळ्यांना उठवण्यात आले. ब्रश केले फ्रेश झालो. तो पर्यंत चुलीवर चहाचे आधण ठेवले होते.

          भगवान दादांच्या शिलेदारांनी प्रत्येकास हेल्मेट, हर्णेस आणि बिले असे सेफ्टी किट दिले. अंधारच होता ज्यांचा चहा पिऊन झाला आहे त्यांना पुढे जायला सांगितले. आम्ही पण सुरुवात केली पंधरा वीस मिनिटात आम्ही बोराट्याच्या नाळे जवळ पोचलो अंधार होता बॅटरीच्या उजेडात आम्ही ती नाळ उतरत होतो

नाळ उतरेपर्यंत उजेड पडायला सुरुवात झाली होती. ती नाळ सरळ खाली जात होती. अर्ध्यावर गेल्या नंतर उजव्या बाजूने रायलिंग पठाराच्या कपारी कपारीने आम्ही चालत होतो. डाव्या बाजूला खोल दरी होती. समोर उंचच्या उंच लिंगाणा दिसत होता. सूर्याच्या कोवळ्या किरणांच्या प्रकाशाने 'लिंगाणा' सोनेरी दिसत होता.

          वाजता आम्ही लिंगाणा माचीवर पोचलो होतो. भगवान दादांच्या शिलेदारांनी पुढे जाऊन रोप बांधुन ठेवलेला होता. हा किल्ला कुठल्याही सुरक्षा-साधनां शिवाय चढणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे. कारण जी वाट वरती जाते ती खूप निमुळती आहे. दोन्ही बाजूला खोल दरी आणि जंगल आहे. वाट पण घसरडी आहे. हे सगळं समोर दिसत होते. जे अगोदर पोचले होते त्यांनी चढाईला सुरुवात केले होती. भगवान दादांनी सगळ्यांचे बिले, हर्णेस तपासून घेतले आणि पुढे पाठवले



आम्ही सगळ्यात शेवटी होतो. पुढे सगळ्यांची रांग लागलेली होती. आम्ही .३० वाजता चढाईला सुरुवात केली दोन्ही बाजूला खुप खोल दरी होती. दादांनी सगळ्यांना ताकीद देऊन ठेवली होती की काही झाले तरी रोप मधून बिले काढायचे नाही. आम्ही हळू हळू पुढे सरकत होतो. काही ठिकाणी उंच कडे होते त्यामुळे त्याठिकाणी वरती चढायला उशिर लागत होता. थोडे वरती गेल्या नंतर जोरात हवा सुरू झाली होती. तोल जात होता. खाली पाहिले तर खोल दरी दिसत होती. कडा चढताना चांगलाच कसं लागत होता. माझ्या हाताची ताकत कमी पडत होती.

 

          आम्ही मध्यावर पोचलो होतो. उजव्या बाजूला एक गुहा आणि डाव्या बाजूला पाण्याचे टाके आहे. आम्ही ती गुहा जाऊन पाहिली. त्या गुहे मध्ये कैदी ठेवत असत. आम्ही काही फोटो काढले. समोर रायलिंग पठार दिसत होते. पुढे चढाईला सुरुवात केली. आम्ही चौघे एका मागे एक असेच चालत होतो. जस-जसे वर जात होतो तस-तशी दरी खूप खोल होत होती

आमच्या समोर जे वरती चढत होते त्यांची अवस्था आम्ही बघत होतोप्रत्येक जन जपूनच पाऊल टाकत होताएकमेकांना प्रोत्साहन देत आमचे गिर्यारोहण चालू होतेमला तर प्रोत्साहनाची खूप गरज भासत असे आणि  काम निलेश करत होता.

आम्हाला लिंगाण्याच्या माथ्यावर पोचायला १२ वाजले असतील . सगळ्यात शेवटी आम्ही पोहोचलो होतो. समोर एक काका शीर्षासन करून लिंगाण्याला वंदन करत होते.लिंगाणा चढणे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्नं असते. ते आम्ही पूर्ण केले होते. माथ्यावर पोचल्यावर सगळं थकवा निघुन गेला. आनंद गगनात मावेनासा झालामाथ्यावर पोचल्यावर सकाळपासून अंगात असलेले हर्णेस, हेल्मेट काढून ठेवले. आजूबाजूला नजर फिरवली तर तोरणा, राजगड, रायगड किल्ले दिसत होते. या माथ्यावरुन संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवता येत होत. म्हणून या किल्ल्याला स्वराज्यात अनन्य साधारण महत्त्व होते. काजलने आणि निलेश ने जे काही बरोबर आणले होते ते आम्ही पटा-पट खाऊन घेतले. थोडा आराम पण केला

भगवान दादांना सांगून आम्ही परतीचा प्रवास चालू केला. बाकीचे अजून बसलेलेच होते. काहींचा फोटो सेशन चालू होते. आम्ही सगळ्यात शेवटी पोचलो आणि सगळ्यात पहिल्यांदा निघालो. 

          मी, काजल, निलेश आणि तेजस निघालो. पहिला टप्पा आम्ही रॅपलिंग करून उतरलो. रॅपलिंग करताना हाताची ताकत कमी पडत होती. म्हणून आम्ही रॅपलिंग करता दोरीच्या मदतीने उतरलो. आमच्या तिघांचा उतरण्याचा वेग जास्त होता. तेजस आमच्या पासून मागे राहिला होता. आमच्या जवळ चे पाणी संपले होतेमध्यावर आल्या वर डाव्या बाजूला जे पाण्याचे टाके आहे त्याच्यातून पाणी पिले. पाणी खुप थंड आणि चविष्ट होते. बिस्लरीच्या पाण्याला या पाण्याची सर नाही. पोटभर पाणी पिले आणि भरून पण घेतले आणि निघालो. उतरतताना मला जास्त त्रास होत नव्हता. त्यामुळे आमचा उतरण्याचा वेग पण जास्त होता. गर्दी काहीच नव्हती सगळे अजून मागेच होते. दीड पावणेदोन तासात आम्ही उतरलो होतो. हर्णेस, हेल्मेट काढून बॅगेत ठेवले. थोडावेळ थांबलो, बाकीच्यांनी आत्ता कुठे उतरायला सुरुवात केली होती. तेजस खूप लांब राहिला होता. तो फोटो काढत निवांत उतरत होता. आम्ही चालायला सुरुवात केली रायलिंग पठाराच्या कड्याच्या बाजूनी आम्ही चालत होतो. उजव्या बाजूला खोल दरी होती.


  थोड्याच वेळात आम्ही बोरट्याच्या नाळे जवळ पोचलो. जी पहाटे अंधारात आम्ही उतरलो होतो. आता तिचे रौद्ररूप दिसत होते. मोठ-मोठाले दगड त्या नाळे मध्ये होते. पावसाळ्यात पठारवरचे आणि डोंगरावरचे पाणी या नाळे मधुन खोल दरीत जात होते. आम्ही ती नाळ चढत होतो. नाळ चढून गेल्यावर, थोडे चालल्यावर आम्हाला आमची बस दिसली. आम्ही सायंकाळी :४५ ला बस जवळ पोचलो.

           आमचे गिर्यारोहण पूर्ण झाल्याचे खुप आनंदी झालो होतो.


!! जय शिवराय!!

  !!धन्यवाद!!
 

7 comments:

  1. Dream trek of every trekker😊💪🏼

    ReplyDelete
  2. सर. शब्द अपुरे पडतात वर्णन करायला.खरोखरच ग्रेट बर का

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद तात्या!!!

      Delete